aishwarya rai  team esakal
मनोरंजन

ऐश्वर्या दुसऱ्यांदा आई होणार, फोटो पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय विषयी कुठली का माहिती असेना ती तिच्या चाहत्यांना नेहमी जाणून घ्यायची असते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - विश्वसुंदरी ऐश्वर्या राय विषयी कुठली का माहिती असेना ती तिच्या चाहत्यांना नेहमी जाणून घ्यायची असते. आणि ती माहिती जर का तिच्या प्रेग्नंसीविषयीची असल्यास त्याला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. हे यापूर्वीच्या तिच्याविषयीच्या बातम्यांवरुन दिसुन आले आहे. आताही ती एका पोस्टवरुन चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे ऐश्वर्या ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय. सोशल मीडियावर ऐश्वर्या नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट नव्हे तर चक्क प्रेग्नंसीबदद्लची एक माहिती समोर आली आहे. (aishwarya rai bachchan is pregnent become mother for second time yst88)

सोशल मीडियावर दुसऱ्यांदा ऐश्वर्या प्रेग्नंट चर्चेत असल्याची बातमी व्हायरल झाली आहे. सध्या तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून फॅन्सनं असा अंदाज बांधला आहे की, ती प्रेग्नंट आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. अजून त्या बातमीला अधिकृत कुठला आधार मिळालेला नाही. ऐश्वर्याच्या घरातील कुणीही त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो चर्चेत आहे.

आता ऐश्वर्याचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यात तिचं वजन वाढलेलं दिसतं आहे. त्या फोटोंवरुन ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, ऐश्वर्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे म्हणून. त्या फोटोंना सेलिब्रेटी पत्रकार विरल भयानीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन व्हायरल केले आहे. त्यात ऐश्वर्या, अभिषेक आणि मुलगी आराध्या हे दिसत आहे.

त्या फोटोंमध्ये ऐश्वर्यानं काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिनं त्या फोटोमध्ये कुठलाही मेकअप केलेला नाही. त्या फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, ऐश्वर्याचे वजन वाढलेले आहे. फोटोकडे आणखी बारकाईनं पाहिल्यास त्यात ऐश्वर्याचे पोट वाढलेले दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यानं ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचा अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT