abhishek and aishwarya
abhishek and aishwarya Team esakal
मनोरंजन

'आमच्यात भांडण झालं की, आम्ही बंगालीतच बोलतो'

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan ) आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (aishwarya rai) हे बॉलीवूडमधील प्रख्यात जोडपं आहे. ते सोशल मीडियावर सर्वात अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या एका विधानामुळे अभिषेकची पत्नी असणा-या ऐश्वर्यानं ज्यावेळी त्यांच्यात भांडणे होतात तेव्हा घडणा-या प्रसंगाविषय़ी चाहत्यांना सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्या गोष्टीचे नवल वाटले आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींविषयी जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोंडींमध्येही त्यांना कमालीचा रस असल्याचे दिसून आले आहे. ( aishwarya rai jaya bachchan speak in bengali when they unite against abhishek bachchan )

अभिषेक आणि ऐश्वर्या हे सोशल मीडियावर नेहमी आपले फोटो शेअर करुन चाहत्यांची पसंती मिळवताना दिसतात. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यानं आपल्या आईच्या जन्मदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता तर त्यांची मुलगी आराध्याही सोशल मीडियाच्या पोस्टवर दिसू लागली आहे. ती अभिषेक बरोबर बॉब विश्वासमध्ये दिसणार आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी जया बच्चन (jaya bachchan )यांनी आपल्या सूनेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्या चांगली सून आहे. ती बच्चन फॅमिलीचा आदर करते. तिनं दोन्ही घरात चांगले नाते जोपासले आहे. आम्हाला तिचा गर्व वाटतो. ती गुणी अभिनेत्री तर आहेच त्याशिवाय आदर्श सूनही असल्याची पोचपावती जया बच्चन यांनी यावेळी दिली होती. बिग बी अमिताभ बच्चनही सोशल मीडियावर आपल्या सुनेचे गुणगाण गाताना दिसून आले आहेत.

जेव्हा ऐश्वर्या ( aishwarya rai ) आणि अभिषेकमध्ये (abhishek bachchan) भांडणे होतात तेव्हा ते एकमेकांशी बंगाली भाषेत बोलत असल्याचे अभिषेकनं सांगितलं आहे. अभिषेकचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात त्याने सांगितले आहे की, माझी आई जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या या माझ्याबद्दल एकमेकांशी बंगालीत बोलतात. जया बच्चन या बंगाली चांगल्या पध्दतीनं बोलतात. ऐश्वर्यानं ऋतुपर्णो घोष यांच्या चोखेर बाली चित्रपटाच्या वेळी बंगाली भाषा शिकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT