Aishwarya Rajinikanth
Aishwarya Rajinikanth Esakal
मनोरंजन

Aishwarya Rajinikanth: थलायवा रजनीकांतच्या मुलीच्या घरी चोरी.. हिरे अन् सोन्याचे दागिने केले लंपास

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज तमिळ अभिनेते रजनीकांत यांची मोठी मुलगी आणि चित्रपट निर्माती ऐश्वर्या रजनीकांत हिने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिच्या घरातून लाखो रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तिने तक्रारीत म्हटलं आहे. या संदर्भात ऐश्वर्याने तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्ररित तिनं तिच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे.

या तक्ररीनुसार चोरी झालेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये दागिन्यांमध्ये हिऱ्यांचा सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, नेकलेस आणि जवळपास 60 सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असल्याचं तिनं म्हटलं आहे.

एफआयआरमध्ये नमूद केलेल्या चोरीच्या दागिन्यांची अंदाजे किंमत 3.6 लाख रुपये असली तरी त्यापेक्षा जास्तही असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐश्वर्याने म्हटले आहे की, 2019 मध्ये तिची धाकटी बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी वापरल्यानंतर तिने हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. लॉकर ऐश्वर्याच्या ताब्यात असतानाही ते तीन ठिकाणी हलवण्यात आले आहे.

ऑगस्ट 2021 पर्यंत ते दागिने सेंट मेरी रोडवरील तिच्या अपार्टमेंटमध्ये होते आणि त्या नंतर ते CIT कॉलनीतील धनुषसोबत शेअर केलेल्या घरी ठेवले होते आणि सप्टेंबर 2021 मध्ये पुन्हा सेंट मेरी रोड अपार्टमेंटमध्ये अन् त्यानंतर ते रजनीकांतच्या घरी ठेवल्याचं तिनं सांगतिलं आहे.

पुढे ती म्हणते की “लॉकरच्या चाव्या सेंट मेरी रोड अपार्टमेंटमधील माझ्या वैयक्तिक स्टीलच्या कपाटात ठेवल्या होत्या. हे माझ्या कर्मचाऱ्यांना माहीत होतं. मी घराबाहेर असतानाही ते वारंवार अपार्टमेंटमध्ये यायचे,”

तिनं 10 फेब्रुवारी रोजी लॉकर तपासलं आणि हे दागिने गायब आढळल्याचं तिनं म्हटलं होतं. ऐश्वर्याने घरातील काम करणाऱ्या 3 जणांवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे.

ऐश्वर्या सध्या तिच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनावर काम करत आहे, ज्यामध्ये तिचे वडील रजनीकांत कॅमिओची भूमिका करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT