Aishwaryaa Rajinikanth hospitalized  esakal
मनोरंजन

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रुग्णालयात

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या अभिनेत्याला देवाचा दर्जा दिला जातो त्या रजनीकांत यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते.

सकाळ डिजिटल टीम

Tollywood news: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या अभिनेत्याला देवाचा दर्जा दिला जातो त्या रजनीकांत यांच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. (Tollywood actor Rajnikanth) काही महिन्यांपूर्वी त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र त्याला त्यांनीच पूर्णविराम दिला. त्यानंतर त्यांचे जावई धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांच्या घटस्फोटाची बातमी व्हायरल झाली होती. त्यांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेतला आहे. आता ऐश्वर्याच्या आरोग्याविषयी बातमी व्हायरल (Entertainment News Viral) झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आणि पोस्ट कोविडची लक्षणं तिला आढळल्यानं ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वी तिला 1 फेब्रुवारीला कोरोना झाल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर ती पुन्हा तिच्या एका व्हिडिओच्या शुटींगसाठी बाहेर पडली होती. (Aishwaryaa Rajinikanth hospitalized)

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि धनुषनं आम्ही वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. आमचं नातं हे सध्या वेगळ्या संकटातून जात असल्याचे ऐश्वर्यानं सांगितले होते. यासगळ्यातून सावरत असताना ऐश्वर्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. दरम्यान तिच्या एका व्हिडिओचे शुटींगही सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा तिला पोस्ट कोव्हिडनं (Post Covid News) रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. ऐश्वर्याचा मुसाफिर नावाचा व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरु होतं त्यावेळी तिला अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागला. डोकेदुखी वाढली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऐश्वर्यानं इंस्टावरुन तिचे काही फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे की, पहिल्यापेक्षा तब्येतीत फरक जाणवत आहे. लवकरच पुन्हा कामावर परतेन. यावेळी तिनं महिला दिनाच्या निमित्तानं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रथिका चेरी यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कोविडनंतर देखील पोस्ट कोविडमध्ये होणारा त्रास गंभीर आहे. त्याविषयी लोकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. असं ऐश्वर्यानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT