Ajay Devgan and Siddharth Malhotra upcomning film thank god boycott trend Google
मनोरंजन

Boycott Ajay Devgan म्हणू लागेलयत लोक, अभिनेत्याचा 'थॅंक गॉड' सिनेमा रडारवर

अजय देवगणच्या 'थॅंक गॉड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला नाही तोवर बॉयकॉट गॅंगने सिनेमातील कथानकावर आक्षेप घेतला आहे.

प्रणाली मोरे

Boycott Ajay Devgan: अजय देवगणच्या(Ajay Devgan) 'थॅंक गॉड'(Thank God) सिनेमाचा ट्रेलर ८ सप्टेंबरला रिलीज केला गेला. या सिनेमात अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मु्ख्य भूमिका आहेत. ट्रेलरच्या माध्यमातून सिनेमातील अजय देवगणचा लूकही समोर आला आहे. सिनेमा दिवाळीच्या धामधूमीत म्हणजे २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांचे आहे. हा एक विनोदी धाटणीचा सिनेमा आहे. सिनेमात दाखवलं गेलं आहे की सिद्धार्थ मल्होत्राचा अपघात होतो, त्यानंतर त्याच्या कर्मांचा हिशोब त्याला थेट चित्रगुप्ताच्या दरबारात द्यावा लागतो. अजय देवगणनं सिनेमात चित्रगुप्ताची भूमिका केली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास सगळ्याच बॉलीवूड सिनेमांविरोधात बॉयकॉट ट्रेन्ड सुरू आहे. तर मग यामधून अजय देवगणचा 'थॅंक गॉड' कसा वाचेल बरं.(Ajay Devgan and Siddharth Malhotra upcomning film thank god boycott trend)

सोशल मीडियावर सिनेमाला आणि सोबत अजय देवगणलाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जातेय. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, चित्रगुप्त आणि हिंदू देव-देवतांची ज्यापद्धतीनं सिनेमात खिल्ली उडवली गेली आहे त्याचा विरोध केला जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण बॉलीवूडला आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे.

Ajay Devgan and Siddharth Malhotra upcomning film thank god boycott trend
Ajay Devgan and Siddharth Malhotra upcomning film thank god boycott trend
Ajay Devgan and Siddharth Malhotra upcomning film thank god boycott trend

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की,'बॉलीवूडला विनोद करायचे असतील तेव्हा फक्त हिंदू देवच दिसतात का? थॅंक गॉड मध्ये अजय देवगणनं चित्रगुप्तांची भूमिका केली आहे,ज्याच्या मागे कमी कपडे घालून मुली उभ्या दिसतायत. आणि ते वासना या विषयावर घाणेरडे विनोद करत चर्चा करताना दिसत आहेत. हिंदू देव मस्करी करण्यासाठी आहेत का?'

आणखी एकाने लिहिलं आहे,'कधीपर्यंत आम्ही अशा घाणेरड्या मनोरंजनाला आणि अभिनयाला सहन करायचं?'

तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'हिंदूंच्या नावावर आणि हिंदू देवांच्या नावावर अश्लीलता दाखवणं सुरू आहे ते बंद करा'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

SCROLL FOR NEXT