Ajay devgan rap going viral on social media
Ajay devgan rap going viral on social media esakal
मनोरंजन

Runway 34: अजय झाला 'रॅपर', चाहत्यांना आवडला सिंघमचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

अजय देवगण त्याच्या येणाऱ्या 'रनवे ३४' या चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे.आणि आता त्याचा रॅपही नेटकऱ्यांना वेडं करतोय.या चित्रपटात अभिनयाबरोबच अजयचा चित्रपटाच्या दिग्दर्शनातही महत्वाचा वाटा आहे.या चित्रपटात त्याने एक रॅप गायला आहे.ज्याची सध्या नेटकऱ्यांमधे चांगलीच चर्चा सुरू आहे.त्याच्या 'रनवे ३४' या चित्रपटासाठी या रॅपची निर्मीती करण्यात आली आहे.

‘रसोडे में कौन था’असं गाणं एका मालिकेच्या डायलॉगमधून तयार करणाऱ्या यशराज मुखाटेसोबत अजयने हा रॅप बनवला आहे.जलाया तो नही न असे या रॅपचे नाव आहे.यामधे अजयचे काही डायलॉगही नेटकऱ्यांना ऐकायला मिळतील.(RAP)यशराजने शेअर केलेल्या या व्हिडिओमधे अजय त्याला एक रनवे ३४ साठी एका ट्रॅक बनवायला लावतो.त्यावर यशराज त्याला म्हणतो ठीक आहे सर आपण मुव्हिमधले काही डायलॉग घेऊ आणि त्यावर रील्स बनवू त्यावर अजय त्याला म्हणतो ये थ्रीलर फिल्म है इसलिये मै जैसा कहता हू वैसा करो.नंतर यशराज यावर एक गाणं बनवतो ज्यामधे तो अजय देवगणचा जलाया तो नही न हा डायलॉग वापरतो.(Runway 34)

अजयचा नवीन चित्रपट हा दोहा ते कोच्ची जाणाऱ्या विमानात घडलेल्या घटनेवर आधारित आहे.चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रित मुख्य भूमिकेत आहेत.तसेच अमिताभ बच्चन, बोमन ईरानी, कैरी मिनाती हे सुद्धा चित्रपटात दिसून येते.अंगिरा धर या चित्रपटात प्रेक्षकांना एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे.आकांक्षा सिंग चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.रनवे ३४ हा चित्रपट २९ एप्रिलला ईदच्या दिवशी चित्रपटगृहांत दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT