Dil Hai Bholaa Song Out: Esakal
मनोरंजन

Dil Hai Bholaa Song Out: 'आज फिर जिने की...'अजयच्या 'अॅक्शनचा रोमान्स'! भोलामधील 'हे' गाणं भलतचं कडक

सकाळ डिजिटल टीम

Dil Hai Bholaa Song Out: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचे चाहते त्याच्या आगामी भोला या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तामिळ हिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही असणार आहेत. हा चित्रपट ३० मार्चला येणार आहे.(Latest Marathi News)

बुधवारी, भोलाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे भोळा चित्रपटाचं टायटल ट्रक रिलिज केलं. अजय देवगणचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचे नवीन गाणे दिल है भोला आज समोर आलं. जे पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आहे. (Marathi Tajya Batmya)

अजय देवगणचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट भोलाचे नवीन गाणे दिल है भोला आज रिलीज झाले आहे. या गाण्यात भोलाच्या प्रेमकथेसोबतच जबरदस्त अॅक्शनही दाखवण्यात आली आहे.

हे गाणे अमित मिश्राने गायले असून इर्शाद कामिल यांनी हे गाणे लिहिले आहे. भोलाचे दिग्दर्शन अजय देवगणनेच केले असून तो स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अजयचा लूक हे चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण आहे. तुफानी अॅक्शन आणि त्याला मसाला मनोरंजनचाही सामावेश भोलाचा ट्रेलर दिसत आहे.

'भोला'च्या रिलीजपुर्वीच या चित्रपटाची क्रेझ दिसत आहे. बॉक्स ऑफिस वेबसाइटच्या एका अहवालानुसार, भोलाने अॅडव्हान्स बुकिंगमधून तीन दिवसांत सुमारे 1 कोटींची बंपर कमाई केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला' या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT