ajay devgn file image
मनोरंजन

अजयने बंगला खरेदीसाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं कर्ज

अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्या शेजारीच घेतला नवीन बंगला

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणने Ajay Devgn नुकताच मुंबईतील जुहू Juhu परिसरात आलिशान बंगला खरेदी केला. अजयच्या जुन्या बंगल्याजवळच हा नवीन बंगला आहे. जवळपास ४७४.४ चौरस मीटर भागात पसरलेल्या या बंगल्याची किंमत ४७.५ कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. हा नवीन बंगला खरेदी करण्यासाठी अजयने १८.७५ कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती समोर येत आहे. 'बॉलिवूड हंगामा' या वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Ajay Devgn takes a loan of almost 19 crore for his new bungalow in Juhu)

गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अजयने हा बंगला खरेदी केला असून यावर्षी ७ मे रोजी वीणा विरेंद्र देवगण आणि विशाल म्हणजेच अजय देवगण यांच्या नावावर ही संपत्ती हस्तांतरित करण्यात आली. भावेश वालिया यांनी त्यांचा हा बंगला अजय देवगणला विकला आहे.

अजय आणि त्याचं कुटुंब सध्या जुहूमधील शिवशक्ती या बंगल्यात राहतं. याच बंगल्याच्या अगदी जवळ अजयने नवीन बंगला खरेदी केला आहे. स्टँप ड्युटीसाठी अजयने २.७३ कोटी रुपये भरले आहेत. बंगल्याच्या खरेदीसाठी यावर्षी २७ एप्रिल रोजी अजयने कर्ज घेतल्याचं समजतंय. अजयने घेतलेल्या या नवीन बंगल्याच्या शेजारी अक्षय कुमार, हृतिक रोशन, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचीही घरं आहेत. अमिताभ बच्चन यांनी घेतलेलं नवीन हे याच परिसरात आहे. बिग बींनी जवळपास ३१ कोटी रुपयांना ५१८४ स्क्वेअर फूटचा फ्लॅट विकत घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Sangli Theft Cases : सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली, भर बाजारात चोरांनी दिलं पोलिसांना आव्हान

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT