ajay kajol 
मनोरंजन

अजय देवगण-काजोल या हिट जोडीला रील आणि रिअल लाईफमध्ये झाली २२ वर्ष पूर्ण.. शेअर केला एक खास व्हिडिओ..

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- अभिनेता अजय देवगण त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींसाठी लाईमलाईटमध्ये असतो. अजय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जेवढा शांत आणि साधा आहे तितकाच पडद्यावर तो एक जबरदस्त अभिनेता आहे.नकतंच अजय देवगण आणि काजोल यांच्या 'प्यार तो होना ही था' या सिनेमाला २२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अजयने सोशल साईटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला आवडते. या जोडीचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या चाहत्यांना जेवढे ते ऑनस्क्रीन आवडतात तेवढेच ते या जोडीला ऑफस्क्रीनही पसंत करतात. दोघांनी एकत्र अनेक हिट सिनेमे दिले ज्यामध्ये 'प्यार तो होना ही था' या सिनेमाचा समावेश आहे. हा सिनेमा १५ जुलै १९९८ ला रिलीज झाला होता. अजयने एक खास व्हिडिओ शेअर करत सांगितलंय की त्यांच्या रिअल आणि रील लाईफला १५ जुलै रोजी २२ वर्ष पूर्ण झाली.   

ट्विटरवर अजयने सिनेमाच्या शूटींग दरम्यानचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'प्यार तो होना ही था' हे गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन अजय देवगणने काजोलला टॅग केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या रिलीज नंतर या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं होतं.

अजय आणि काजोलने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. आज या जोडीला दोन मुलं आहेत. मुलाचं नाव युग तर मुलीचं नाव निसा आहे. सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी काजोल आणि अजय एकत्र 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या सिनेमात दिसून आले होते. सध्या लॉकडाऊनमुळे हे दोघंही त्यांच्या मुलांसोबत घरात वेळ घालवत आहेत.  

ajay devgns completes 22 years with kajol in reel and real life  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

SCROLL FOR NEXT