Ajay Devgn's Drishyam 2 will release on 18 November
Ajay Devgn's Drishyam 2 will release on 18 November sakal
मनोरंजन

Drishyam 2 : या दिवशी येतोय अजय देवगणचा ‘दृश्यम २’.. ही आहे खास बात..

नीलेश अडसूळ

Drishyam 2 Release Date : 'दृश्यम' या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता तब्बल ७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. या संदर्भात बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याने नुकतीच घोषणा केली. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली. (Ajay Devgn's Drishyam 2 will release on 18 November)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), अभिनेत्री तब्बू (Tabbu), श्रिया सरन (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाचा दुसरा कधी येईल याची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत होते. नुकतीच या चित्रपटा दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा अधिक वाढली आहे.

अभिषेक पाठक दिग्दर्शित, या चित्रपटात याही भागात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम आज हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. तर येत्या 18 नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग शुरू झाले तेव्हा अजय देवगण याने या सेटवरील एक झलक शेअर केली होती. या फोटोत त्याच्यासोबत अभिनेत्री श्रिया सरन आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक देखील दिसले होते. 'दृश्यम 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजय देवगणने लिहिले होते की, 'विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का? आताही अजयने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT