Ajay Devgn's Tanaji is now coming
Ajay Devgn's Tanaji is now coming 
मनोरंजन

अजय देवगणचा 'तानाजी' आता येतोय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. अजय देवगण या चित्रपटाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांचे शौर्य मोठ्या पडद्यावर दाखवणार आहे.

हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करणार आहेत. तर, अजय देवगण आणि भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांच्यासह असलेले तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती आहेत. त्यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.
 


स्वराज्यासाठी, जिजाबाईंच्या इच्छेखातर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरे यांना दिली होती. जेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली व स्वराज्यासाठीचे आपल्या कामाला प्राधान्य देत अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे, हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT