ajinkya deo shared emotional post about parents seema deo and ramesh deo  SAKAL
मनोरंजन

Ajinkya Deo: राहिल्या फक्त आठवणी... दोन ओळींमध्ये अजिंक्य देवने सीमा - रमेश देव यांची आठवण मनातलं दुःख मांडलं

अजिंक्यने दोन ओळींची पोस्ट करत आई - बाबांची आठवण सांगितली आहे

Devendra Jadhav

Ajinkya Deo about Seema - Ramesh Deo: आई - वडीलांंचं छत्र हरपणं ही कोणत्याही मुलांसाठी वाईट गोष्ट आहे. पोरकं होण्याची भावना ही मुलांसाठी कल्पनेपलीकडील दुःख आणणारी आहे.

अजिंक्य देव सध्या अशीच दुःखद भावना जगत आहे. अजिंक्य देवची आई अभिनेत्री सीमा देव यांचं काहीच दिवसांपुर्वी निधन झालं. याशिवाय काही वर्षांपुर्वी वडीलांचंही निधन झालं. त्यामुळे अजिंक्यने दोन ओळींची पोस्ट करत आई - बाबांची आठवण सांगितली आहे.

(ajinkya deo shared emotional post about parents seema deo and ramesh deo)

अजिंक्यने दोन ओळींची पोस्ट लिहीत मनातलं दुःख मांडलं

अजिंक्य देवने आई - बाबा रमेश - सीमा देव यांचे फोटो शेअर केलाय. अजिंक्यने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सीमा आणि रमेश देव यांच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत.

आई - बाबा दोघेही गेले.. राहिल्या फक्त आठवणी.. सुंदर गोड आठवणी.. अशी पोस्ट शेअर करत अजिंक्य देवने आई - बाबांची आठवण शेअर केलीय .

आईच्या निधनामुळे अजिंक्य देव झाला भावुक, दिली प्रतिक्रिया

आईच्या निधनाबद्दल बोलताना अजिंक्य देव भावुक झालेले दिसले. त्यांनी प्रतिक्रिया दिली की, "आज माझ्या आईचं सीमा देव यांचं निधन झालं. आज सकाळी ७ वाजता ती गेली. गेली तीन चार वर्ष ती आजारामुळे आयुष्याशी संघर्ष करत होती. तिला विसरण्याचा त्रास सुरु झाला होता.

बाबांना जाऊन आता दीड वर्ष होत आलं होतं आणि आईला काही आठवत नसे ती सगळं विसरून गेलेली पण ती होती. आणि आज आता असं झालंय की दोघंही नाहीयेत. आणि त्यांच्या जाण्याने एवढी मोठी पोकळी कुटुंबात निर्माण झाली आहे की मी बोलू नाही शकत सांगू नाही शकत."

सीमा देव प्रदीर्घ आजाराने निधन

81 वर्षीय अभिनेत्री सीमा देव यांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. ‘सरस्वतीचंद्र’ (1968), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (1977) या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं होतं. गेल्या काही काळापासून सीमा त्यांच्या मुलासोबत मुंबईतील वांद्रे येथे राहत होत्या.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT