Ajinkya Raut marathi actor health deteriorates while shooting for serial Abol Pritichi ajab Kahani begins  SAKAL
मनोरंजन

Ajinkya Raut: मालिकेचं शुटींग सुरु असतानाच मराठमोळ्या अभिनेत्याची तब्येत खालावली, उपचार सुरु

प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Devendra Jadhav

Ajinkya Raut News: एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

(Ajinkya Raut marathi actor health deteriorates while shooting for serial begins, treatment begins)

मालिकेचे चित्रीकरण नियमितपणे सुरु आहेच. त्याव्यतिरिक्त मालिकेच्या प्रमोशन्स साठी देखील तो तितक्याच उत्सुकतेने फिरताना दिसत आहे. दररोज मालिकेचे चित्रकरण सुरु असताना अजिंक्यची तब्बेत थोडी खालावली.

पण प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येण्याच्या उत्सहात तोच ते सगळं विसरलाय. मालिकेच्या सेटवरच तो डॉक्टरांना बोलावून तिथेच त्याचा उपचार तो करत आहे.

त्याच्या चाहत्यांना त्याची फार काळजी असून सोशल मीडिया वर त्यांनी त्यांचे अजिंक्यावरील प्रेम व्यक्त केले. अजिंक्यची तब्बेत लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी ते त्याला सदिच्छा देत आहेत.

अजिंक्यने देखील त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरविशेष पोस्ट करून तो कशी स्वतःची काळजी घेतो आहे आणि तोच सतत कसे काम करतो आहे आणि सोनी मराठी वाहिनी आणि निर्मिती संस्था आणि तो स्वतःची काळजी कसा घेत आहे याबद्दल त्याने सांगितलं.

अबोल प्रीतीची अजब कहाणी हि मालिका त्याची १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला सोनी मराठी वाहिनीवर येणार आहे. मालिकेचे चित्रीकरण नियमित पने करून तब्बेतीची काळजी घेऊन तो मालिकेचे चित्रीकरण करत आहे.

मालिका नियमित पाने प्रेक्षकांच्या भेटीला येईल. " शो मस्ट गो ऑन " म्हणत तो त्याच्या उपचार आणि चित्रीकरण हे करत आहे.

त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा पाहता येणार आहे.

आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' लपूनछापून कशी फुलतेय, हे पाहायला मिळेल.

अजिंक्य च्या चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. त्याचा नव्या मालिकेची प्रेक्षक फार आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेसाठी तो विशेष अशी मेहनत घेताना दिसत आहे. पाहायला विसरू नका, नवी मालिका - 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'. १७ जुलैपासून, सोम. ते शनि., संध्या. ७.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT