Akash Chaudhari Accident esakal
मनोरंजन

Akash Chaudhari : लोणावळ्याला जाणं पडलं महागात! प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात

२०१६ मध्ये मिस्टर इंडियाचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या या अभिनेत्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akash Choudhary Splitsvilla 10 Fame actor : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आकाश चौधरीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या कारचा मोठा अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तो अपघात एवढी भीषण होता की, अभिनेत्याच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आकाशच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आकाश हा त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन लोणावळ्याला निघाला होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला. त्यात आकाशला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१६ मध्ये मिस्टर इंडियाचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या या अभिनेत्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आकाशनं स्प्लिट्सविला १० कार्यक्रमामध्ये सहभाही होऊन नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळवली होती.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

आकाश लोणावळ्याला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाला होता. नवी मुंबईवरुन लोणावळ्याकडे निघाला असताना त्याच्या कारला एका ट्रक चालकानं मागून धडक दिली. त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आकाशच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आकाश हा त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला होता. परखडपणे बोलणे, त्यावरुन कुणी प्रतिक्रिया दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देणे यामुळे आकाश हा नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिला आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT