akash thosar waterfall Rappelling video viral at nashik Dugarwadi waterfall  SAKAL
मनोरंजन

Akash Thosar: जय शिवराय म्हणत नाशिकच्या उंच कड्यावरुन आकाशने मारली उडी, फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला

एका उंच कड्यावरील धबधब्यावरुन उडी मारताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून आकाशच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकलाय.

Devendra Jadhav

Akash Thosar Waterfall Rappelling video: आकाश ठोसर हा मराठी याशिवाय हिंदी मनोरंजन नाव कमावलेला आघाडीचा अभिनेता. आकाशला आपण आजवर अनेक सिनेमांमधुन अभिनय करताना पाहीलंय.

आकाशचा अभिनयाचे सर्वजण फॅन्स आहेतच. आकाश अनेकदा त्याच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढत निसर्गात रमताना दिसतो.

आकाशने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय यात तो एका उंच कड्यावरील धबधब्यावरुन उडी मारताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून आकाशच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकलाय.

(akash thosar waterfall Rappelling video)

काय आहे हा व्हिडीओ

आकाश ठोसरने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत आकाश सुरुवातीला Waterfall Rappelling साठी सज्ज असलेला दिसतोय. आकाश धबधब्याच्या कडेला उभा राहून आकाश Rappelling ची दोरी खाली फेकतो.

धबधब्याचं पाणी मोठ्या प्रवाहात वाहत असतं. आणि आकाश साथीदारांच्या सहाय्याने कड्यावरुन खाली उतरताना दिसतो. आकाशचा हा चित्तथरारक व्हिडीओ पाहून त्याच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकलाय.

आकाशच्या फॅन्सच्या कमेंट्स

"आकाश तुम्ही खतरों के खिलाडी मधे गेले पाहिजेत.."

"सह्याद्रीची सैर करणे कोण्या ऐऱ्या गेऱ्या चे काम नाही त्या साठी सिंहाचे काळीज लागत.. भारी आकाश जय भवानी जय शिवाजी"

"दादा तुम्ही खूपच हिम्मत दाखवली...पहिल्यांदा जी व्यक्ती सहयाद्री मध्ये रॅप्पेल्लिंग करतात त्यांच्या चेहऱ्या वर थोडी फार भीती दिसते पण तुमच्या चेहऱ्यावर ते कुठेही दिसले नाही तुम्ही खूप सहयाद्री प्रेमी आहे..."

"खुप छान आकाश दादा, असेच अजून reels आणि video in future बघायला मिळतील तुमचे हि अपेक्षा आहे..." अशा कमेंट करत आकाशच्या फॅन्सनी त्याच्या साहसीपणाचं कौतुक केलंय

बाल शिवाजी सिनेमासाठी तयारी

आकाशच्या या Rappelling व्हिडीओवर रवी जाधव यांनी कमेंट केलीय. जोरात तयारी सुरु आहे, अशी कमेंट रवी जाधव यांनी केलीय. एकुणच आकाश रवी जाधव यांच्या आगामी बाल शिवाजी सिनेमासाठी आकाश तयारी करत असल्याचं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT