Akshara Singh Bhojpuri Actress Event Public pelted stones  esakal
मनोरंजन

Akshara Event : अक्षराच्या इव्हेंटमध्ये पब्लिक 'आऊट ऑफ कंट्रोल'! पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?

अक्षरा सिंगच्या एका इव्हेंटमध्ये घडलेली घटना ही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Akshara Singh Bhojpuri Actress Event Public pelted stones : अक्षरा सिंगच्या एका इव्हेंटमध्ये घडलेली घटना ही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. भोजपूरी सिनेविश्वातील लोकप्रिय नाव असणाऱ्या अक्षराच्या त्या इव्हेंटमध्ये प्रेक्षकांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्जही करावा लागल्याचे दिसून आले आहे.

भोजपूरी क्वीन म्हणून नेहमीच अक्षरा सिंहचे नाव घेतले जाते. ती तिच्या हटके स्टाईल आणि लूकसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून अक्षराच्या त्या इव्हेंटची चर्चा सुरु होती. अशातच त्या शो मध्ये प्रेक्षकांनी दगडफेक केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक होत लाठीचार्ज करत प्रेक्षकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणली गेली.

दाऊदनगरमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हजर होते. अक्षराची एक झलक पाहण्यासाठी त्याठिकाणी झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. कार्यक्रमस्थळी एवढी गर्दी झाली की त्यामुळे पोलिसांना आक्रमक पवित्रा धारण करावा लागला. ती घटना १७ जानेवारीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहारमधील औरंगाबादमधील दाऊदनगरमध्ये ही घटना घडल्याचे दिसून आले आहे. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अभिनेत्री त्या शहरातील एका दुकानाच्या उद्घघाटनासाठी आली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यात त्या गर्दीनं दगडफेक केली आणि त्या घटनेला हिंसक वळण लागले.

अक्षरा ज्या इव्हेंटमध्ये जाते तिथे चर्चा होताना दिसते. यापूर्वी देखील तिच्या व्हिडिओमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. इंस्टाग्रामवर अक्षराच्या नावाची मोठी प्रसिद्धी आहे. त्या आयोजित इव्हेंटमुळे अक्षराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT