akshay kelkar is winner of Bigg Boss Marathi 4 winner sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4 winner: कमाल! अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी 4 चा विजेता..

अत्यंत हुशारीने खेळणारा अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोरलं आपलं नाव..

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4 winner: गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. गेल्या ९९ दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केले. अगदी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हेसगळंच आपण जवळून पाहिलं. या खेळात सहभागी झालेल्या १६ स्पर्धकांचा खेळ आपण पाहिला. पण विजेता कुणी एकच असतो, आणि अखेर 100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळाला...

(akshay kelkar is winner of Bigg Boss Marathi 4 winner)

गेल्या आठवड्यात सोळा स्पर्धकांमधून top 5 स्पर्धक आपल्याला मिळाले आणि त्यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला. यामध्ये किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत आणि अमृता धोंगडे ही स्पर्धक होते. पण तोडीस तोड खेळी करत, लोकांच्या मतांचा कौल घेत अभिनेता अक्षय केळकर (akshay kelkar) याने या खेळात बाजी मारली.


अक्षय केळकर बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता झाला आणि त्या लखलखणाऱ्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले. अक्षय केळकर विजेता होईल असे अनेकांचे मत होते, कारण अत्यंत हुशारी आणि शिताफीने त्याने आपले डाव टाकत हा खेळ पूर्ण केला आणि विजयी झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अक्षयला विजेतेपदासह 15 लाख 55 हजार रक्कम मिळाली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला.

अक्षयने या खेळासाठी यासाठी प्रचंड मेहनत घेतली, खूप हुशारीने तो खेळला. त्याने कधी कुणाची मनं दुखावली नाहीत. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. मात्र जे पटले नाही त्याला विरोधही केला. त्यामुळे अक्षयचा स्वभाव आणि खेळ पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आवडला. त्याच्या खेळाच्या पद्धतीमुळेच त्याला सगळे मास्टर माइंड म्हणून लागले. अगदी बिग बॉसनेही 'शिकारी', 'जादूगर' अशा शब्दात अक्षयचे कौतुक केले होते. अखेर आपल्या शांत स्वभावाच्या आणि युक्तीच्या जोरावर त्याने ही जेतेपद मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT