akshay 
मनोरंजन

अक्षय कुमार मुंबईत 'या' दिवशी सुरु करणार आगामी सिनेमाचं शूटींग

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोनाच्या काळात सिनेमाचं शूट सुरु करुन संपवलेला अभिनेता अक्षय कुमार आता त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगच्या तयारिला लागला आहे. अक्षय कुमार मुंबईत त्याच्या आगामी सिनेमाचं शूट करणार आहे. दोन दिवसांपासून अक्षय कुमार इंटरनेटवर मास्क न लावलेल्या फोटोंमुळे आणि टिझरमध्ये हिरोईनला जागा न दिल्याने प्रेक्षकांच्या टिकेला सामोरं जात आहे. आता मुंबईत सुरु होणा-या शूटींगसाठी तो तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार काम करण्यासाठी उत्साही आहे. गेल्या आठवड्यात 'बेलबॉटम' सिनेमाचं शूटींग संपवून तो स्कॉटलँडमधून मुंबईत परतला होता. आता अक्षय कुमार लवकरंच त्याच्या आगामी 'पृथ्वीराज' सिनेमाचं शूटींग पूर्ण करण्याच्या तयारित आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक सिनेमासाठी अक्षय ८ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी शूटींगला सुरुवात करणार आहे. यासाठी निर्मात्यांनी आता पूर्ण तयारी देखील केली आहे. मात्र आत्तापर्यंत अक्षयचा लकी नंबर नऊ राहिला आहे. 

'पृथ्वीराज' हा एक युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेला सिनेमा आहे. सध्या युद्धाच्या परिस्थितीच शूट करणं शक्य नाहीये. त्यामुळे निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की या सिनेमातील युद्धाचे सीन्स देखील स्टुडिओमध्ये शूट केले जावेत. यासाठी स्टुडिओमध्ये केवळ ५० लोकंच  उपस्थित राहतील. तसं पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या लढाईच्या सीन्ससाठी जवळपास ४०० ते ५०० लोकांची गरज असते. मात्र सद्यपरिस्थिती पाहता निर्माते या ठिकाणी जास्त लोकांना गोळा न करता स्पेशल इफेक्टच्या माध्यमातून आणि वीएफएक्सच्या माध्यमातून कमाल करुन दाखवतील.

जे लोक शूटींगसाठी उपस्थित राहणार आहेत त्यांची कोरोना टेस्ट करायला सुरुवात झाली आहे. ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह येतील त्यांच्यासोबत शूटींग सुरु केलं जाईल. तसंच जोपर्यंत संपूर्ण शूटींग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही घरी जाऊ शकणार नाही.  

akshay kumar and manushi chhillar film prithviraj shooting start from 8th october  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT