advertise google
मनोरंजन

मी 'त्या' जाहिरातीतून माघार घेतो, अक्षय कुमारने मागितली चाहत्यांची माफी

काही दिवसांपासून तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा मनोरंजन विश्वातील सर्वात शिस्तबद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अॅक्टिंगसाठी तो खास ओळखला जातो. अनेक जाहिरातींमध्ये त्याने काम केले आहे. मात्र आता अक्षय कुमार बद्दल एक वेगळी बातमी समोर येत आहे. सध्या पान मसाल्याच्या एका जाहिरातीमुळे (Akshay Kumar Paan Masala Ad) प्रचंड चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या पान मसालाची जाहिरात केल्यानंतर त्याच्यावर तुफान शेरेबाजी झाली आहे. मात्र, यानंतर आता अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची माफी मागितली आहे. यात तो म्हणतो, मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. काही दिवसांपासून तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन. तथापि, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील. परंतु, मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडून त्यात उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन. मी तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो.

दरम्यान, अक्षय कुमारच्या या जाहिरातीमुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स करत अक्षयने समाजासाठी अहितकारक ठरणाऱ्या अशा जाहिराती स्वीकारू नयेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. एकीकडे अक्षय पान मसालाच्या जाहिरातीत झळकला आणि दुसरीकडे अल्लू अर्जुनने अशाच एका जाहिरातीची ऑफर नाकारल्यामुळे या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक घमासान झालं होतं. या जाहिरातीतल अक्षय कुमारसोबत या जाहिरातीत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खानही झळकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

SCROLL FOR NEXT