bachchan Pandey and the kashmir files esakal
मनोरंजन

'बच्चन पांडे' आपटला, 'काश्मीर फाईल्सनं' उडवला धुव्वा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स प्रदर्शित (Vivek Agnihotri) झाला.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood Movies: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स प्रदर्शित (Vivek Agnihotri) झाला.आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. 11 मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. देशाचे (The Kashmir Files Movie) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काश्मीर फाईल्सचं (PM Narendra Modi) कौतूक ऐकून अनेकांनी काश्मीर फाईल्स पाहिल्याची उदाहरणं आहेत. तसेच या चित्रपटाचं प्रमोशनही मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. आता तर (Entertainment News) त्याला राजकीय आणि धार्मिक रंग चढल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांमध्ये काश्मीर फाईल्सवरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजप प्रणित राज्यांमध्ये तर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशावेळी जे चित्रपट गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झाले त्याला जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बच्चन पांडे (Bachchan Pandey) हा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. मात्र त्याचा द काश्मीर फाईल्ससमोर निभाव लागला नाही. या चित्रपटानं मान टाकली आहे. दिवसेंदिवस काश्मीर फाईल्सला मिळणारा प्रतिसाद पाहता बच्चन पांडेला मोठ्या प्रमाणात स्क्रिन मिळून देखील प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे हैद्राबाद, ओरिसा याठिकाणी थिएटरमध्ये बच्चन पांडे आणि काश्मीर फाईल्स यावरुन मोठा वाद झाला होता. त्यात काही व्यक्तींनी तर प्रेक्षकांना बच्चन पांडे हा चित्रपट न पाहता काश्मीर फाईल्स पाहण्यास प्राधान्यक्रम द्यावा. अशी धमकीवजा गळ घालण्यास सुरुवातही केली होती. त्याचाही परिणाम बच्चन पांडेवर झाला.

काश्मीर फाईल्सच्या बाबत बोलायचे झाल्यास आता या चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता त्याची वाटचाल 200 कोटींकडे सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यात देखील एस एस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्यालाही काश्मीर फाईल्सचा सामना करावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेला RRR आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचेही प्रमोशन जोरदार झाले आहे. त्यासाठी निर्मात्यांनी सलमान खान, आमिर खान यांची मदत घेतली आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT