Akshay Kumar
Akshay Kumar esakal
मनोरंजन

Akshay Kumar : 'देशात सगळ्यात जास्त टॅक्स भरतो तरीही मला...' अक्षय कुमारची वेगळीच खंत

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar bollywood actress highest tax payer : बॉलीवूडचा खिलाडी हा गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा सेल्फी नावाचा चित्रपट ज्या वेगानं आला त्याच वेगानं तो बॉक्सऑफिसवरुन निघुनही गेला. तो चित्रपट फ्लॉप झाल्यानं अक्षय कुमार ट्रोल होत आहे.

अक्षयनं त्याच्या सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. देशातल्या वेगवेगळया शहरांमध्ये देखील तो त्यासाठी गेला होता. त्यासाठी त्यानं तीन मिनिटांत तीनशेहून अधिक सेल्फी घेऊन एक आगळा वेगळा विक्रमही केला होता. त्याची चर्चा झाली होती. आता अक्षय कुमार त्याच्या इन्कम टॅक्सच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. यंदाच्या वर्षातला त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला खरा मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळालेला नाही.

Also Read - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

असं म्हटलं जातं कधी काळी कर्ज घेऊन घर खरेदी करणाऱ्या अक्षयकडे आज एकापेक्षा जास्त घरं आहेत. देशामध्ये सर्वात जास्त कर भरणारा तो कलावंत आहे. याचा अक्षयला अभिमान आहे. मात्र ज्या वेगवेगळया कारणामुळे तो ट्रोल होतो त्यामुळे त्यानं नेटकऱ्यांना काही गोष्टींबाबत आवाहन केले आहे. आपण बऱ्याचदा अपुऱ्या माहिती अभावी काहीही बोलत असतो. त्याचे काय परिणाम होतात याचा विचार नेटकरी करत नाहीत.

अक्षयची ही खंत त्याला ज्या प्रकारे ट्रोल केले जाते त्याविषयी खूप काही सांगून जाते. अक्षयनं कोरोनाच्या काळात देखील लोकांना मोठ्या प्रमामात सहकार्य केले होते. त्यानं आतापर्यत १२५ कोची रक्कम ही दान म्हणून दिली आहे. एका कार्यक्रमामध्ये अक्षयनं आपल्या गुंतवणूकीविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. त्यात तो म्हणाला, मी देशात सगळ्यात जास्त टॅक्स पे करतो. येत्या काळात पाच चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. आतापर्यत मी १२५ कोटींचे डोनेशन देखील दिले आहेत.

लोकांना माझे चित्रपट का आवडत नाही याचे उत्तर त्यांच्याकडेच आहे. आपण त्यांचे मनोरंजनाचे काम करत राहायचे. रसिकांचे मनोरंजन करणे हा प्राधान्याचा विषय आहे. असे अक्षयनं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT