akshay kumar, selfiee, emran hasmi SAKAL
मनोरंजन

सिनेमे फ्लॉप झाल्यावर जबाबदारी कुणाची? Selfiee फ्लॉप झाल्यानंतर Akshay Kumar ने सोडलं मौन

तीन दिवसात अक्षय कुमारचा Selfiee सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला

Devendra Jadhav

Akshay Kumar News: अक्षय कुमारचा सेल्फी सिनेमा नुकताच रिलीज झालाय. तीन दिवसात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. अक्षय कुमारचे दिवस सध्या पालटले आहेत.

सूर्यवंशी सोडल्यास अक्षय कुमारचे पुढचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणादण आपटत आहेत. याशिवाय OTT वर रिलीज झालेल्या अक्षयच्या सिनेमांची सुद्धा अजिबात चर्चा नाही.

( Akshay Kumar broke his silence after Selfiee flopped)

अक्षय कुमारचे गेल्या वर्षभरात ओळीने सिनेमे फ्लॉप झाले आहेत. नुकताच रिलीज झालेला सेल्फी सिनेमा सुद्धा फ्लॉप सिनेमांच्या यादीत समाविष्ट होणार असल्याची शक्यता आहे.

यामुळे अक्षयच्या निर्माते - दिग्दर्शकांचं मोठं नुकसान झालंय. सिनेमे फ्लॉप होण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल अक्षयला विचारण्यात आला.

सलग तीन-चार फ्लॉप सिनेमे फ्लॉप झाल्याने अक्षय म्हणाला, "माझ्यासोबत असे पहिल्यांदाच घडत नाहीये. माझ्या कारकिर्दीत मला एकावेळी सलग १६ फ्लॉप चित्रपट मिळाले आहेत. एक वेळ अशी होती की मी माझ्याकडे सलग आठ चित्रपट आले जे चालले नाहीत.

आता माझ्याकडे लागोपाठ तीन-चार चित्रपट आले जे चालले नाहीत. गोष्ट अशी आहे की, चित्रपट फ्लॉप होण्यामागे माझीच चूक असते.

आता प्रेक्षक बदलले आहेत, त्यामुळे तुम्हाला बदलण्याची गरज आहे, तुम्हाला स्वतःला पडताळून पाहण्याची गरज आहे. तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल कारण प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पाहण्याची गरज आहे."

अक्षय पुढे म्हणाला, "जर तुमचे चित्रपट चालत नसतील तर ती तुमची चूक आहे. हि एक मोठी वॉर्निंग आहे. तुमचे चित्रपट सलग फ्लॉप होतात, तेव्हा तुमच्यासाठी धोक्याची घंटा असते. तुमच्यासाठी बदलण्याची वेळ आली आहे.

मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे, मी एवढेच करू शकतो" तो असेही म्हणाला की मी सर्वांना सांगू इच्छितो की, 'जेव्हा चित्रपट चालत नाहीत तेव्हा प्रेक्षकांना दोष देऊ नये.

ही 100%. माझी चूक आहे. तुम्ही सिनेमासाठी ज्या गोष्टी वापरत आहात ते चुकीचं आहे याची जाणीव तुम्हाला असायला हवी”

सेल्फी नंतर आता अक्षय महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात याशिवाय ओह माय गॉड २, हेरा फेरी ३, बडे मिया छोटे मिया अशा सिनेमांमध्ये झाकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT