akshay kumar
akshay kumar 
मनोरंजन

अक्षय कुमार सांगतोय वेगवेगळ्या भाषेतील शिव्या ऐकायच्या नसतील तर 'ही' गोष्ट करा..

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार कोरोना व्हायरसच्या काळात अनेक वेगवेगळे उपाय त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. वेगवेगळे मार्ग अवलंबत तो या संकटकाळात लोकांना जागरुक राहण्याविषयी सांगत आहे. सोशल मिडियावर अक्षयने असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना सरळ सरळ सांगतोय की जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या भाषेत शिव्या ऐकाव्या लागतील.

अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एक खास मेसेज लोकांना देत आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी वेगवेगळे लोक येतात आणि कॅमेराकडे बघून ते शिव्या देतात. शिव्या म्हणजे या सौम्य प्रकारच्या शिव्या आहेत. वेगवेगळ्या भाषेत ते मूर्ख, गाढव, बेअक्कल अशा प्रकारच्या शिव्या देताना दिसत आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी येऊन अक्षय सांगतो कि 'कोरोना व्हायरसच्या या संकटात असं काय कराल ज्यामुळे तुम्हाला लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागणार नाहीत?'

अक्षय पुढे सांगतो की, जर तुम्हाला प्रत्येक भारतीय भाषांमध्ये शिव्या खायची इच्छा नसेल किंवा तुम्हाला कोणी वाईट बोललेलं आवडणार नसेल तर निमुटपणे मास्कचा वापर करा. या व्हिडिओच्या शेवटी अक्षय कुमार व्यवस्थितपणे मास्क घालताना दिसतोय. 

अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनच्या काळात थोडी सूट दिल्यानंतर सगळ्यात आधी अक्षय कुमारनेच एका जाहीरातीचं शूट केलं होतं. यादरम्याने सेटवरील अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत टीममधील काही सदस्य मास्कचा वापर करताना दिसून आले होते. 

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, अक्षय पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये त्याच्या बेलबॉटम या सिनेमाचं शूट करणार आहे. त्यानंतर तो नोव्हेंबरमध्ये पृथ्वीराज सिनेमाच्या शूटींगला देखील सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जातंय.  

akshay kumar to fans do not forget to put on your mask  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT