good news 
मनोरंजन

अक्षय कुमारचा हा चित्रपट 11 जूनला होणार पुन्हा प्रदर्शित; कधी आणि कसा? घ्या जाणून...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः कोरोनामुळे चित्रपटगृहे आणि चित्रीकरण बंद आहे. भारतातील चित्रपटगृहाचा पडदा कधी उघडेल हे सांगता येत नाही. मात्र जगातील काही ठिकाणी थिएटर्स सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणची थिएटर्स सुरू आहेत आणि तेथे चित्रपट दाखविले जात आहेत.  दुबईत काही ठिकाणी थिएटर्स सुरू आहेत. पण नेमका कोणता चित्रपट दाखवावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

कारण भारतात लॉकडाऊन असल्याने कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे आता दुबईतील थिएटर्समध्ये अक्षय कुमार, करिना कपूर खान आणि दिलजित दोसांज यंचा 'गुड न्यूज' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला होता. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. राज मेहताने तो दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. 

आता दुबईत आता तो 11 जूनला पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. याबद्दल अक्षय कुमार म्हणाला, की दुबईने माझ्या चित्रपटांवर नेहमीच प्रेम केले आहे आणि आता अशा निराशादायक वातावरणात माझा चित्रपट तेथील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करील अशी आशा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT