Akshay Kumar has shared a romantic post on Twinkle Khanna's birthday 
मनोरंजन

ट्विंकलच्या वाढदिवशी अक्षयची 'खास' रोमँटिक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज ४७ वा वाढदिवस आहे. याच दिवशी ट्विंकल खन्नाचा पती अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट लिहून तिला बर्थडे ‌विश केलं आहे. अक्षयची पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टसोबतच अक्षयने ट्विंकलसोबत एक सुंदर फोटो शेयर केला आहे. ट्विंकलचे चाहतेसुद्धा सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

अक्षय कुमारने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले आहे, 'आयुष्याच्या निर्णयावर प्रश्न विचारणारा आणखी एक वर्ष. आयुष्याच्या या सर्व निर्णयांमध्ये तू माझ्याबरोबर आहेस याचा मला आनंद आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना.' फोटोत दोघेही पार्कमध्ये हसत आणि सायकल घेऊन पोज दिलेले दिसत आहेत. या पोस्टवर लाखोंच्या वर लाईक मिळाले आहे. ट्विंकलला अनेक चाहते बर्थडे विश करत आहेत. 

अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिचा वाढदिवस तिचे वडिल सुपरस्टार राजेश खन्नाबरोबर शेअर करते. अक्षयने अलीकडेच 'अतरंगी रे' चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. यात सारा अली खान आणि धनुष त्यांच्यासोबत तो दिसणार आहेत. याशिवाय अक्षयकडे 'सूर्यवंशी', 'बेल बॉटम', 'बच्चन पांडे', 'रक्षाबंधन', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' असे चित्रपट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT