Akshay Kumar Mouni Roy Shirtless Video Viral esakal
मनोरंजन

Akshya Kumar : 'मौनीसोबत नाचताना अक्षयचं सुटलं भान, शर्ट काढून...'

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा कधी काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. तो गेल्या वर्षापासून चांगल्या हिट चित्रपटाच्या शोधात असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Akshay Kumar Mouni Roy Shirtless Video : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा कधी काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. तो गेल्या वर्षापासून चांगल्या हिट चित्रपटाच्या शोधात असल्याचे दिसून आले आहे. याही वर्षी त्याला बॉक्स ऑफिसनं दूर लोटले आहे. येत्या काळात त्याचा ओह माय गॉडचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची चर्चा आहे. यातच एका व्हिडिओमुळे अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

अक्षयला ट्रोल करण्यासाठी नेटकऱ्यांना कोणतेही कारण पुरते. तो कधी त्याच्या चित्रपटाच्या विषयावरुन ट्रोल होताना दिसतो तर कधी त्याच्या हटक्या प्रतिक्रियेमुळे. मात्र आता एका डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यात त्यानं प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसमोर केलेला डान्स नेटकऱ्यांच्या संतापाचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांनी तर त्याला तुझे वय काय, तू करतो काय असे म्हणत त्याच्यावर टीका केली आहे. त्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, मौनी रॉय, सोनम बजावा अक्षयच्याच खिलाडी ७८६ चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्या दौऱ्याच्या वेळेस अक्षयनं मौनीसमोर शर्टलेस होत डान्स सुरुवात केली. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. काही दिवसांपासून नोरा फतेही, दिशा पटानी, जसलीन रॉयल, अपारशक्ती खुराना आणि स्टेबिन बेन यांचा परदेश दौरा सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. भारतीय संस्कृतीला वेगळ्या प्रकारे सादर करण्याचे काम त्या दौऱ्यातून केले जात आहे.

मौनीसमोर अक्षय कुमार शर्टलेस झाल्यानंतर नेटकऱ्यांचा भडका उडाला आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, अक्षय तू जे काही करतो आहेस ती आपली संस्कृती नाही. ती कॅनडा देशाची संस्कृती आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तू असे काही करतो आणि ट्रोल झाल्यानंतर पुन्हा नेटकऱ्यांच्याच नावानं ओरडतो की, मला ट्रोल केले जाते. अक्षय तुला थोडी का होईना लाज वाटायला हवी. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार

Karnataka Politics : ठरलं...! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे नेमकं काय म्हणाले...

प्रेमाची गोष्ट 2 मध्ये स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम घालणार धुमाकूळ ! रिलीजपूर्वीच जोडीची चर्चा

India Afghanistan relations: अफगाणिस्तानातील भू-राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भारताची भूमिका

SCROLL FOR NEXT