akshay kumar praised pm modi narendra modi but netizens troll him mission raniganj  SAKAL
मनोरंजन

Akshay Kumar on Modi: "पासपोर्ट पाहताच करतात मोदींचं कौतुक" अक्षय कुमारचा अनुभव ऐकून नेटकरी म्हणतात...

अक्षय कुमारने नुकत्याच एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केलाय

Devendra Jadhav

Akshay Kumar on Narendra Modi: अक्षय कुमार सध्या मिशन रानीगंज सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.

अशातच अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आलाय. कारण सुद्धा तसंच काहीसं आहे. अक्षय कुमारने एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. काय म्हणाला अक्षय पाहूया.

(akshay kumar praised pm modi narendra modi but netizens troll him)

अक्षय कुमारने नरेंद्र मोदींचं केलं कौतुक

अक्षय कुमारने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय,"आज मी पासपोर्ट घेऊन परदेशी एअरपोर्ट ऑफीसला उभा असतो. तेव्हा ते माझा पासपोर्ट बघतात. मला खूप आदर मिळतो अशावेळी. आणि ते सुद्धा अत्यंत आदर आणि सन्मानाने मला म्हणतात, अच्छा तुम्ही मोदींच्या देशातून आहात तर."

अक्षयचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

अक्षयच्या बोलण्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

अक्षय कुमार टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. याला कारण असं की, अक्षयला भारताचं नागरिकत्व १५ ऑगस्ट २०२३ ला मिळालं. त्यानंतर अक्षय भारतात त्याच्या विविध सिनेमांचं शूटींग करण्यात व्यस्त आहे.

अशातच अक्षय मुलाखतीत म्हणाला, परदेशातील विमानतळांवर इमिग्रेशन विभाग भारतीय पासपोर्ट पाहून त्याला मान देतो आणि ते सांगतात की तुम्ही मोदींच्या देशाचे आहात.

पण अवघ्या दोन महिन्यात भारताचं नागरिकत्व मिळालेला अक्षय परदेशात कधी गेला, असा सवाल त्याला नेटकरी करत असून त्याच्या बोलण्याची खिल्ली उडवत आहेत.

अक्षय कुमारचा मिशन रानीगंज सिनेमा भेटीला

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘मिशन रानीगंज’ सिनेमा काहीच दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सिनेमात खऱ्या आयुष्यातील नायक जसवंत गिलची कथा आहे. अक्षय कुमारने चित्रपटात जसवंत गिलची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत 65 खाण कामगार अडकल्याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमार अभिनीत पात्र जसवंत सिंग गिल सर्व 65 खाण कामगारांचे प्राण वाचवते. या घटनेनंतर जसवंत सिंग गिल हे 'कॅप्सूल गिल' म्हणून ओळखले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT