Swachhata Hi Seva Abhiyan:  
मनोरंजन

Swachhata Hi Seva Abhiyan: खिलाडी कुमार, रजनीकांतसोबत देबोलिनाच्या लहान लेकीचाही स्वच्छता मोहिमेला हातभार!

Vaishali Patil

Swachhata Hi Seva Abhiyan: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी श्रमदान’ कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत आहे यात सामान्य नागरीकांसह अनेक राजकिय नेते आणि कलाकार मंडळींनीही सहभाग घेताना दिसत आहे.

मनोरंजन विश्वातील कलाकारांनीदेखील या अभियानात सहभाग घेत स्वच्छता केली. यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने देखील भाग घेतला. अक्षयने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो झाडू मारताना दिसत आहे.

अक्षय कुमार हातात मोठा झाडू घेऊन पांढरा शर्ट घालून समुद्रकिनारा साफ करताना दिसला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो लिहितो की, “स्वच्छता ही केवळ भौतिक जागा नाही, तर ती मनाची स्थिती आहे.” देशाबाहेर असल्याने मला स्वच्छता मोहिमेला भाग घेण्यापासून रोखू शकले नाही. म्हणून मी म्हणेन की तुम्ही कुठेही असाल, तुमची जागा आणि मन गोंधळमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी देखील या मोहिमेत भाग घेतला आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास पोस्ट लिहिली.रजनीकांत यांनी स्वच्छता मोहिमेसंबधित एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे

स्वच्छता मोहिमेसाठी एक ट्विट करत रजनी लिहितात की, "स्वच्छ वातावरणापासून निरोगी वातावरणाची सुरुवात होते.. चला भारत स्वच्छ ठेवूया.."

रजनी यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. काही तासातच त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. त्याचे चाहते त्यांचे कौतुक करु लागले.

तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील देबिना बॅनर्जी आणि गुरमीत यांनी देखील मुंबईतील समुद्रकिनारी साफ सफाई केली. मात्र यावेळी त्याच्या लेकीनं सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. देबिनाच्या लेकीनं तिच्या छोट्याशा हाताने या ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रमात हातभार लावला. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सप्टेंबरच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. या श्रमदानासाठी पीएम मोदींनी एक तारीख, एक तास, एक साथ असा नारा दिला आहे. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT