Akshay Kumar news  esakal
मनोरंजन

Akshay Kumar: 'दुसरं अपत्य पाहिजे तर...' ट्विंकलची अक्षयसमोर होती अजब अट

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून अक्षय हा कोणत्या ना कोणत्या वेगळ्या कारणासाठी लाईमलाईटमध्ये आला आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actor Akshay Kumar News: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या हटकेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून अक्षय हा कोणत्या ना कोणत्या वेगळ्या कारणासाठी लाईमलाईटमध्ये आला आहे. पृथ्वीराजचं फ्लॉप होणं, त्याच्या अगोदरच्या बच्चन पांडेला प्रेक्षकांनी नाकारणे, आणि आता रक्षाबंधनवर काही नेटकऱ्यांनी बहिष्कार घालण्याची मागणी केली (Twinkle Khanna News) आहे. त्यामुळे अक्षयच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. यापूर्वी देखील अक्षयच्या चित्रपटांना वादाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दरवेळी अक्षयचा कोणताही चित्रपट आला की त्यावरुन वाद होतोच. असं समीकरण दृढ झालं आहे.

आता अक्षयची पत्नी व्टिंकलनं एक अजबच अट अक्षयसमोर ठेवली आहे. हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. फिल्मफेयर मासिकाला मुलाखत देण्यासाठी एकत्र आले असताना या दोन्ही सेलिब्रेटींची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये लग्न केलं. अक्षय आणि ट्विंकलला दोन मुलं आहेत. त्यांची नाव आरव आणि नितारा अशी आहेत. ही गोष्ट 2016 मधील आहे जेव्हा अक्षय आणि ट्विंकल हे करण जोहरच्या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी वेगळ्या विषयावर आपली मतं व्यक्त केली होती.

यावेळी ट्विंकलनं अक्षय समोर एक अट ठेवली होती. ती निताराच्या जन्मापूर्वीच तिनं अक्षयला सांगितली होती. सध्या ही चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचे कारण अक्षयचा नवा चित्रपट. टि्वंकल अक्षयला म्हणाली होती की, जर तुला दुसरा बेबी हवं असेल तर येणाऱ्या चित्रपटांमध्ये सेन्सिबल रोल करावे लागतील. तसं केल्यास आपण दुसऱ्या अपत्याचा विचार करु. त्यामुळे अशी ही वेगळी अट ऐकून अक्षयला काही बोलावे कळेना..

अक्षय आणि ट्विंकल यांनी एक वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. व्टिंकलचे अक्षयपूर्वी एक ब्रेक अप झाले होते. त्यामुळे ती देखील नव्या रिलेशनबाबत तयार नव्हती. अशा वेळी जो काही निर्णय घ्यायचा तो विचारपूर्वक असं त्यांनी ठरवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT