Akshay Kumar, Raveena Tandon To Reunite In Welcome 3: Esakal
मनोरंजन

Akshay Raveena Back: तब्बल 19 वर्षांनंतर अक्षय -रवीनाची जोडी येणार एकत्र? 'या' चित्रपटात करणार धमाल!

अक्षयच्या पुढच्या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टंडन सोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Vaishali Patil

Akshay Kumar, Raveena Tandon To Reunite: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा सध्या त्याच्या OMG2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. अक्षयच्या गेल्या काही चित्रपटांकडे पाहिलं तर त्याचे सलग सहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते मात्र OMG2 ने आता अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर फुल स्टॉप लावला आहे.

सध्या अक्षय कुमार त्याच्या सिनेमातील अभिनेत्रीच्या नावामुळे चर्चेत असते. आता अक्षयच्या पुढच्या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टंडन सोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता ज्यावेळी अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडींपैकी एक आहे.

यासोबतच दोघांनीही एकमेकांना बराच काळ डेट केले होते. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. त्याचे प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप आणि नंतर दुसऱ्याशी लग्न झाल्यानंतर दोघांची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही.

त्याचे चाहते या जोडीला खुप मिस करत होते. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते अजूनही उत्सुक आहेत. आता तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडन आता 'वेलकम 3'मध्ये एकत्र काम करणार आहेत. 'वेलकम टू द जंगल'मध्ये ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

असं झाल्यास तब्बल 19 वर्षानंतर या जोडीला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर एकत्र पाहतील. यापुर्वी रवीना आणि अक्षय कुमार यांनी मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी, खिलाडियों का खिलाडी आणि बारूद या चित्रपटात एकत्र काम केले होते. तर दोघांचे टिप-टिप बरसा पानी हे गाणे ब्लॉकबस्टर हिट आहे.

अक्षय कुमार याशिवाय या चित्रपटात संजय दत्त, अर्शद वारसी आणि दिशा पटानी सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहेत. तर यावेळी नाना पाटेकर आणि अनिल कपुर या चित्रपटात दिसणार नाहीत. हा सिनेमा पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT