Kriti Sanon, Akshay Kumar and Jacqueline Fernandez at Bachchhan Paandey event.
Kriti Sanon, Akshay Kumar and Jacqueline Fernandez at Bachchhan Paandey event. Google
मनोरंजन

Bachchhan Paandey: अक्षयने भर कार्यक्रमात 'बच्चन' नावाची उडवली खिल्ली

प्रणाली मोरे

अक्षय कुमार(Akshay Kumar)चा 'बच्चन पांडे'( Bachchhan Paandey) सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या अक्षय आणि 'बच्चन पांडे' टीम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी दिसतेय. या सिनेमाच्याच एका प्रमोशन निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं सिनेमाच्या नावावरनं एक मोठा खुलासा केला आहे. या सिनेमात अक्षय कुमारनं अजब दिसणारा निळ्या रंगाच्या दगडाचा डोळा असलेला गॅंगस्टार साकारलाय. त्याच्यासोबत कृती सनन,जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सिनेमात कृती सनन(Kriti Sanon) ही बच्चन पांडेवर सिनेमा काढण्यासाठी उत्सुक असलेल्या दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर जॅकलिन(Jacqueline Fernandez)नं अक्षयच्या म्हणजेच 'बच्चन पांडे'च्या प्रेयसीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अक्षयला एक मजेदार प्रश्न विचारला,ज्यावर बॉलीवूडच्या खिलाडीनं त्याच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं. अक्षयला पत्रकारांपैकी एकानं प्रश्न विचारला की,''बच्चन पांडे सिनेमाचं नाव बॉलीवूडमधील 'बच्चन' आणि 'पांडे' फॅमिलीची आठवण करू देतं याविषयी तुला काय म्हणायचंय?'' त्यावर अक्षय म्हणाला,''जेव्हा 'हाऊसफूल 4' चं यश साजरं करण्यासाठी आम्ही पार्टीला भेटलो होतो तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर अभिषेक आणि चंकीचा फोटो आला अन् फरहाद सामजीसोबत मिळून आम्ही या सिनेमाचं नाव ठरवून टाकलं. 'हाऊसफूल 4' हा फरहादनेच दिग्दर्शित केला होता,जो आता बच्चन पांडेचा दिग्दर्शक आहे. तर 'हाऊसफूल 4' मध्ये चंकी पांडेनं पेहला पास्ता-आखरी पास्ताची भूमिका साकारली होती.

अक्षयनं बच्चन पांडे सिनेमाआधी 'खिलाडी 420' आणि 'अजनबी' सिनेमात खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. 'बच्चन पांडे' सिनेमातही खलनायक साकारताना धम्माल आल्याचं अक्षय म्हणाला. ''मला जेव्हा कळलं की,खलनायकाला नायकापेक्षा चांगली भूमिका आहे,त्याच्या भूमिकेचा ग्राफ नायकाच्या भूमिकेपेक्षा चढा आहे आणि सिनेमा संपताना शेवटच्या १० मिनिटात तो बाजी पलटवताना दिसतोय,तेव्हा ते साकारणं खूप समाधान देऊन जातं''. असं त्यानं खास नमूद केलं. 'बच्चन पांडे' सिनेमा फरहाद सामजीनं दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी,अभिमन्यू सिंग,संजय मिश्रा,प्रतिक बब्बर असे तगडे कलाकारही आहेत. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवालानं केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT