cm akshay kumar rohit shetty 
मनोरंजन

अक्षय कुमार, रोहित शेट्टीने मानले उद्धव ठाकरेंचे आभार

सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट

स्वाती वेमूल

राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा आणि धार्मिक स्थळांपाठोपाठ चित्रपट आणि नाट्यगृहांचा पडदा २२ ऑक्टोबरपासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. नाट्य व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची शनिवारी भेट घेतली. निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर, खासदार संजय राऊत हे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतरच नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून खुली करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलं. या निर्णयानंतर मनोरंजनविश्वातून आनंद व्यक्त करण्यात आला. अक्षय कुमार Akshay Kumar, रोहित शेट्टी Rohit Shetty यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. Cinema and drama theatres to reopen in Maharashtra.

'अनेक कुटुंबं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानणार आहेत. महाराष्ट्रात २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे खुली करण्यास परवानगी देण्यासाठी त्यांचे आभार. आता कोणीही थांबवलं तरी थांबणार नाही.. पोलीस येत आहे', असं कॅप्शन देत अक्षयने 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. तर दिग्दर्शक रोहित शेट्टीने उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यानेसुद्धा मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार मानले आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमार, रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी रोहित शेट्टी प्रतीक्षा करत होता. लॉकडाउनदरम्यान अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी ओटीटीचा पर्याय निवडला. मात्र 'सूर्यवंशी'च्या टीमने चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनोरंजनविश्वातील अनेकांना दिलासा मिळाला आहे.

सुमारे दीड वर्षापासून मनोरंजन क्षेत्र ठप्प होते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची धास्ती आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या याचा विचार करून सरकारने गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होणारी ठिकाणे बंदच ठेवण्याची भूमिका घेतली होती. सिने-नाट्यगृहे बंद असल्याने मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काम नसल्याने कलाकार तसेच पडद्यामागील कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT