highest earning bollywood actors of 2020 
मनोरंजन

कोरोना काळातही बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी केली जबरदस्त कमाई

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- एकीकडे कोरोनाचा फटका संपूर्ण सिनेसृष्टीला बसला असताना बॉलीवूडच्या काही कलाकारांनी मात्र या काळातही जबरदस्त कमाई केली आहे. अनेकांनी डिजीटल माध्यमाच्या पर्याय स्विकारला तर काहींनी या काळात खबरदारी घेत शूटींग संपवल्या. त्यामुळे साहजिकंच त्यांना नवीन प्रोजेक्टसाठी वेळ मिळाला. या सगळ्यात नंबरवनवर आहे तो अभिनेता अक्षय कुमार. 

अक्षय कुमार- 'बच्चन पांडे', 'अतरंगी रे', 'बेल बॉटम', 'पृथ्वीराज' यांसारखे सिनेमे प्रदर्शनाच्या रांगेत असताना बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने २०२० या वर्षातही सर्वाधिक कमाई केली आहे. या यादीत अक्षय पहिल्या स्थानावर आला आहे.

दुसरं नाव आहे दबंगमिया सलमान खानचं. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सलमानचे 'राधे' आणि 'कभी ईद कभी दिवाली' हे सिनेमे यावर्षी रिलीज होऊ शकले नाहीत. तरीसुद्धा या कोरोना काळात दुसरं स्थान पटकावण्यात तो यशस्वी झाला आहे.

तिस-या स्थानावर आहे बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान. शाहरुखने २०१८ पासून ब्रेक घेऊनसुद्धा सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत तिसरा नंबर पटकावला आहे. त्याने नुकतंच 'पठाण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षात एक सिनेमा करूनदेखील या यादीत टॉप-५ मध्ये चौथ्या क्रमांकावर आपलं स्थान पक्कं केलंय. आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमाच्या रिलीजची फार उत्सुकता आहे.

तर २०२० मध्ये ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा अजय देवगण पाचव्या नंबरवर आहे. जानेवारीत प्रदर्शित झालेला त्याचा 'तान्हाजी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. 

akshay kumar salman khan shah rukh khan highest earning bollywood actors of 2020   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT