Akshay Kumar & Tiger Shroff Instagram
मनोरंजन

Viral Video: 55 वर्षाच्या अक्षयनं टायगर श्रॉफला दिवसा दाखवले तारे! म्हणाला,'मैं खिलाडी..तू..'

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं खिलाडी कुमारच्या गाजलेल्या गाण्यावर असा दमदार डान्स केला आहे की सोशल मीडियावर सध्या याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Viral Video: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोघे पहिल्यांदाच 'बडे मियां छोटे मियां' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

पण त्याआधी या दोन अभिनेत्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक दमदार मोस्ट एनर्जेटिक आणि एंटरटेनिंग व्हिडीओ आणला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत.

चला पाहूया हा डान्स व्हिडीओ जो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.(Akshay Kumar & Tiger Shroff Dance Video Viral Main Khiladi Song)

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'सेल्फी' आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार,डायना पेंटी,नुसरत भरूचा आणि इमरान हाश्मी नजरेस पडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील 'मै खिलाडी.. ' हे पार्टी सॉंग रिलीज केलं गेलं होतं. याच गाण्यावर अक्षय कुमारनं टायगर श्रॉफ सोबत डान्स केला आहे.

टायगर आणि अक्षयनं इन्स्टाग्राम रील्स बनवताना मॅचिंग सनग्लासेस आणि ब्लॅक आऊटफीट घालून दमदार परफॉर्मन्स दिला आहे. दोघांच्या एनर्जेटिक डान्स स्टेप्स पाहून अर्थात कुणीही त्या व्हिडीओच्या प्रेमात पडेल.

या व्हिडीओतील सगळ्यात खास गोष्ट ही आहे की ५५ वर्षाच्या अक्षय कुमारने ३२ वर्षाच्या टायगरला अशी जबरदस्त टक्कर दिली आहे की चाहत्यांनी खिलाडी कुमारवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. या दोघांमध्ये २३ वर्ष वयाचं अंतर आहे असं कुणीच मानायला तयार होणार नाही. अर्थात अक्षय कुमार इंडस्ट्रीतला सगळ्यात फीट अभिनेता आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.

आता 'मै खिलाडी.. ' या गाण्याविषयी बोलायचं झालं तर १९९४ साली आलेल्या अक्षयच्या 'मै खिलाडी तू अनाडी' या सिनेमातील गाण्याचे हे रीमेक व्हर्जन आहे. राज मेहता दिग्दर्शित 'सेल्फी' सिनेमा २४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT