Akshay Kumar's OMG 2 Put on Hold by Censor Board Amid Adipurush Controversy?  SAKAL
मनोरंजन

OMG 2 Controversy: अक्षय कुमारचा सिनेमा रखडला, सेन्सॉरच्या कैचीत सापडला, CBFC चा निर्णय बघा

आदीपुरुष सिनेमामळे जो गदारोळ माजला त्यामुळे OMG 2 सिनेमा रखडलाय.

Devendra Jadhav

OMG 2 Controversy News: अक्षय कुमारचा OMG 2 सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सिनेमाचा टीझर काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. टीझरमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या रुपात दिसत आहे.

तर पंकज त्रिपाठी आस्तिक असलेल्या सामान्य माणसाची भुमिका साकारतोय. सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना आवडला. समीक्षकांनी सुद्धा टीझरचं तोंड भरुन कौतुक केलं.

पण आता मात्र सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकलाय. नुकताच आदीपुरुष सिनेमामळे जो गदारोळ माजला त्यामुळे OMG 2 सिनेमा रखडलाय.

OMG 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतल्याचे कळतंय. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना CBFC सोबत अडचणी येत आहेत.

निर्मात्यांना हा सिनेमा Review समितीकडे नेण्यास सांगितला आहे. तथापि, 'OMG 2' च्या निर्मात्यांना अद्याप CBFC कडून कोणतीही सूचना मिळालेली नाही.

मि़डीया रिपोर्टनुसार, CBFC ने 'OMG 2' प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, 'आज तक' वृत्तानुसार, 'वादग्रस्त संवादां'मुळे 'आदिपुरुष'ला मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर CBFC हाय अलर्टवर आहे.

एका सूत्राने सांगितले की, हा चित्रपट रिव्हिजन कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. 'आदिपुरुष'च्या काळात ज्या प्रकारे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या,

त्याची पुनरावृत्ती OMG 2 बाबत होता कामा नये, याची खबरदारी CBFC घेत आहे. त्यामुळे  OMG2 चं प्रदर्शन तुर्तास रखडलं आहे.

आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सिनेमात यामी गौतम वकीलाच्या भुमिकेत दिसणार आहे. ११ ऑगस्टला OMG 2 रिलीज होतोय.

 अक्षय कुमार बद्दल बोलायचं झाले तर गेले काही दिवस त्याच्यासाठी काही खास चांगले ठरलेले नाहीत. त्याने एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी त्यानंतर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू आणि त्यानंतर इम्रार हाश्मीसोबतचा सेल्फी हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नाहीत. त्यामुळे अक्षयच्या  OMG2  कडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT