Akshay Kumar’s Selfiee movie flops disastrously box office collection Day 1  sakal
मनोरंजन

Selfiee Box Office Collection: अक्षयचा 'सेल्फी' दणदणीत आपटला! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारचा बहुचर्चित 'सेल्फी' सिनेमा शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला पण पहिल्याच दिवशी तो दणदणीत आपटला.

नीलेश अडसूळ

Selfiee Box Office Collection Day 1: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा 'सेल्फी' काल शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी ड्रामा असलेला हा चित्रपट चांगला चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता, पण पहिल्याच दिवशी हा चित्रपट दणदणीत आपटला आहे. विशेष म्हणजे पुढेही हा चित्रपटात फारशी कामाई करू शकणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अक्षय आणि इम्रान सोबत या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत रिमेक आहे. पण तिथे चाललेला हा सिनेमा बॉलीवुडवर मात्र जादू करू शकला नाही.

(Akshay Kumar’s Selfiee movie flops disastrously box office collection Day 1 )

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि इमरान हाशमी यांचा 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची वाट पाहत्त होते. पण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा चित्रपट पूर्णतः अयशस्वी ठरला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'सेल्फी' समाधानकारक कमाई करू शकला नाही.

गेल्या वर्षी अक्षयचे अनेक सिनेमे आले पण तेही फ्लॉप झाले. त्यामुळे 'सेल्फी'कडून अक्षयलाच खूप अपेक्षा होत्या, पण पहिल्याच दिवशी चित्रपटाला एवढा कमी प्रतिसाद मिळाला की हाही चित्रपट आपटला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सेल्फी'ने पहिल्या दिवशी फक्त 3 कोटींची कमाई केली आहे. 

हा सिनेमा तयार करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा बिग बजेट सिनेमा असल्याने मोठी कमाई करेल असे वाटले होते पण या चित्रपटाने प्रेक्षकांसह निर्मात्यांचाही अपेक्षा भंग केला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'सेल्फी' या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

इमरान हाशमी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण त्यानंतरही विजय चाहत्याला एक 'सेल्फी' देतो का हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT