akshaya deodhar first mangalagaur after wedding with hardeek joshi SAKAL
मनोरंजन

Akshaya Deodhar: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीत अक्षया देवधरची मेहंदी सजली, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री अक्षया देवधर लग्नानंतर पहिली मंगळागौर साजण्यासाठी सज्ज झालीय

Devendra Jadhav

श्रावणात लग्न झालेल्या स्त्रियांचा लाडका सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर खेळण्यासाठी स्त्रिया आनंदात एकत्र येतात आणि मंगळागौर साजरी करतात.

अशातच अभिनेत्री अक्षया देवधर लग्नानंतर पहिली मंगळागौर साजण्यासाठी सज्ज झालीय. अक्षयाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अक्षया देवधर मंगळागौरीसाठी सजताना दिसतेय.

मंगळागौरीसाठी अक्षयाने काढली सुंदर मेहंदी

अक्षयाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अक्षयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय.

या मेहंदीत अक्षयाच्या हातावर महामृत्युंजय मंत्र काढलेला दिसतोय. याशिवाय अक्षयाच्या हातावर अक्षयाची मंगळागौर असं लिहिलेलं दिसतंय. एकुणच अक्षया मंगळागौरसाठी जय्यत तयारी करताना दिसतेय.

हार्दिक - अक्षया जेजुरीला

असं दिसतंय की, लग्नानंतर हार्दिक - अक्षया पहिल्यांदाच जेजुरीला गेल्याचं दिसतंय. या व्हिडीओत सुरुवातीला जेजुरी गड दिसतो.

पुढे गडाच्या पायऱ्यांवर हार्दिकने दोन हातांनी अक्षयाला उचललं. आणि तो गडाच्या पायऱ्यांवर चालत राहीला.

पुढे हार्दिक - अक्षया देवाची पुजा करताना आणि अभिषेक करताना दिसले. दोघांनी मनोभावे मल्हारीची प्रार्थना केली. पुढे हार्दिकने मल्हारीची तलवार उचलली. हार्दिक - अक्षयाला पहायला त्यांच्या फॅन्सनी गर्दी केलेली दिसली.

हार्दिक आणि अक्षयाचं वर्कफ्रंट

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अन्य मराठी कलाकारांनी काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मराठी कलाकारांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणं ही सर्वांसाठी आश्चर्यकारक गोष्ट होती. अशातच राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला याचं कारण सांगीतलंय.

त्याच्यासोबत त्याची बायको म्हणजेच अक्षया देवधरने सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. हार्दिक लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात झळकणार आहे. अक्षया सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय. हार्दिक सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT