akshaya deodhar hardeek joshi first mangalagaur photos viral  SAKAL
मनोरंजन

Akshaya - Hardeek: सोनेरी रंग, भव्य सजावट... अक्षया - हार्दिकची लग्नानंतरची पहिली शाही मंगळागौर, फोटो व्हायरल

हार्दिक - अक्षया दोघांनी लग्नानंतरची पहिली मंगळागौर उत्साहात साजरी केलीय

Devendra Jadhav

श्रावणात खेळला जाणाऱ्या मंगळागौरीच्या सणाची उत्सुकता सर्वांना असते. मंगळागौर खेळण्यासाठी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अशातच बाईपण भारी देवा सिनेमामुळे मंगळागौरीच्या नवी मजा समस्त महिलावर्गाला समजलीय.

लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीची मजाच काही और असते. लग्नानंतर हार्दिक - अक्षया यांनी पहिली मंगळागौर साजरी केलीय. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.

(akshaya deodhar hardeek joshi first mangalagaur photos viral)

हार्दिक - अक्षयाची लग्नानंतरची शाही मंगळागौर

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केलीय. या दोघांचे मंगळागौर साजरे करतानाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेत.

हार्दिक - अक्षया दोघांनी सोनेरी रंगाचा एकमेकांना मॅचिंग ड्रेस परिधान केला होता. याशिवाय दोघांच्या घरी महादेवाची आलिशान सजावट करुन पूजा करण्यात आली. दोघांचे नातेवाईक या खास सोहळ्याला उपस्थित होते.

मंगळागौरीसाठी अक्षयाने काढली सुंदर मेहंदी

अक्षयाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अक्षयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय.

या मेहंदीत अक्षयाच्या हातावर महामृत्युंजय मंत्र काढलेला दिसतोय. याशिवाय अक्षयाच्या हातावर अक्षयाची मंगळागौर असं लिहिलेलं दिसतंय. एकुणच अक्षया मंगळागौरसाठी जय्यत तयारी करताना दिसतेय.

हार्दिक आणि अक्षयाचं वर्कफ्रंट

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अन्य मराठी कलाकारांनी काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

त्याच्यासोबत त्याची बायको म्हणजेच अक्षया देवधरने सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. हार्दिक लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात झळकणार आहे. अक्षया सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय. हार्दिक सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT