akshaya deodhar hardeek joshi wedding chief minister eknath shinde wishes video call viral sakal
मनोरंजन

Hardeek Akshaya Wedding: राणादा-पाठकबाईंच्या लग्नात अचानक एक फोन वाजला आणि..

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या यांच्या लग्नात थेट मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि ते म्हणाले..

नीलेश अडसूळ

Akshaya Deodhar and hardeek joshi: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी आपल्या अनेक वर्षाच्या नात्याला अखेर लग्नबंधनात बांधलं अन् त्यांच्या अनेक चाहत्यांना सुखानुभव दिला. २ डिसेंबर,२०२२ रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी पुण्यात आप्तेष्ट आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. दोघांनीही अगदी रितसर विधी-परंपरांचा सोहळा साजरा करत दणक्यात लग्न केलं. पण या लग्नाचं रिसेप्शन सुरू असताना अचानक एक फोन वाजला मंचावरील संपूर्ण चित्रच पालटून गेलं.

(akshaya deodhar hardeek joshi wedding chief minister eknath shinde wishes video call viral)

अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यानंतर खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईंकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. राजकीय मंडळीदेखील त्यांच्या रिसेप्शनला उपस्थित होते. याच सोहळ्यात अचानक एक फोन खणखणला आणि सर्वांचच लक्ष वेधलं गेलं. तो फोन होतो खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा.

हार्दिक अक्षयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील आमंत्रण दिलं होतं. पण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी हार्दिक -अक्षयाला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून व्हिडीओ कॉल केला. आणि या कॉलच्या माध्यमातून त्यांनी दोघांनाही शुभाशीर्वाद दिले. हा मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ कॉलवर मुख्यमंत्री म्हणाले, 'मला लग्नाला यायला जमलं नाही म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर हार्दिक म्हणाला," धन्यवाद सर.. ठाण्यात आलो की भेटायला येतो.. घरी येऊन जातो.. " हा कॉल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT