Al Pacino Father At 82 Age  Esakal
मनोरंजन

Al Pacino: प्रसिद्ध अभिनेता वयाच्या 82 वर्षी होणार बाप! 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट..

Vaishali Patil

Al Pacino Father At 82 Age: हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते अल पचिनो वयाच्या 82 व्या वर्षी पुन्हा एकदा वडील होणार आहेत.

पचिनो या आधीही तिन मुलांचा बाप आहे. पचिनो हा त्याची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जी त्याच्यापेक्षा 53 वर्षांनी लहान आहे. नूर आठ महिन्यांची गर्भवती आहे आणि लवकरच बाळाची आई होणार आहे.

अल पचिनो या वयात वडील झाल्याबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहे. पचिनो आणि नूरच्या नात्याची बातमी तेव्हा प्रसिद्ध झाली जेव्हा दोघे 2022 मध्ये डिनर डेटवर एकत्र दिसले होते. कोविडच्या काळापासून दोघेही रिलेशनशीपमध्ये होते.

त्यामुळे अल पचिनो चौथ्यांदा वडील होणार आहे. पचिनोला आधीच 33 वर्षांची मुलगी ज्युली मेरी आणि 22 वर्षीय मुले अँटोन आणि ऑलिव्हिया ही जुळी मुले आहेत. पचिनोने 2008-18 मध्ये लुसिला पोलॅकला देखील डेट केले पण तिला मुले नाहीत.

2014 च्या एका मुलाखतीत अल पचिनोने मुलांबद्दल मोकळेपणाने बोलले आणि म्हणाले, 'मी त्याच्यासाठी जबाबदार आहे. मी त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे.

अल पचिनो हा त्याच्या काळातील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. तो अभिनेता 'इनसोम्निया', 'द आयरिशमॅन' 'द गॉडफादर', 'स्कारफेस', 'हीट', 'द डेव्हिल्स अॅडव्होकेट' आणि 'सेंट ऑफ अ वुमन' यांसारख्या क्लासिक्समधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

तर त्याची गर्लफ्रेंड नूर बद्दल सांगायचं झाल तर ती स्वतः खूप श्रीमंत कुटुंबातून आलेली आहे आणि ती खूप श्रीमंत आणि वृद्ध लोकांना डेट करत असते.

पचिनोच्या आधी वयाच्या 22 व्या वर्षी नूरने 74 वर्षीय प्रसिद्ध गायक मिक जेगरला डेट केले होते.

त्याचबरोबर नूरने ६० वर्षीय अब्जाधीश निकोलस बर्ग्रेनलाही डेट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT