Ali Fazal And Richa chaddha Wedding reception to host 400 guests-Inside details Google
मनोरंजन

Richa Chaddha Wedding: असं असणार मुंबईतलं ग्रॅंड रीसेप्शन, वाचा सविस्तर...

Richa Chaddha -Ali Fazal येत्या सप्टेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत,अशी बातमी आहे.

प्रणाली मोरे

Ali Fazal And Richa chaddha Wedding: ऋचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पण आता आम्ही तुमच्यासमोर त्यांच्या लग्नाची(Wedding) इत्तंभूत माहिती समोर आणली आहे. आपण सगळेच ऋचा आणि अली कधी सात फेरे घेतायत याची वाट पाहत आहोत. आता कळंतय ते आनंदाचे क्षण लवकरच येणार आहेत. ऋचा चड्ढा आणि अली फझल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.(Ali Fazal And Richa chaddha Wedding reception to host 400 guests-Inside details)

अली आणि ऋचा २०२१ मध्येच खरंतर लग्न करणार होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. आता दोघांनी अखेर यावर्षी लग्न करण्याचं निश्चित केलं. ऋचा आणि अली यावर्षी सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत. लग्नानंतर मुंबईत हे कपल रीसेप्शन देणार असून त्यात फक्त ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

अली फझल आणि ऋचा चड्ढाच्या लग्नाचे सगळे सोहळे मुंबई आणि दिल्लीत पार पडणार आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ऋचा आणि अली दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत. दिल्लीमध्ये दोघांचे कुटुंबिय लग्नसोहळ्यात सामिल होणार आहेत. त्यानंत मुंबईत होणारा लग्नसोहळा हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडेल. याआधी मेहेंदी,संगीत हे सोहळे होतील. लग्नानंतर रीसेप्शन पार्टी होणार असून त्यामध्ये ३५० ते ४०० पाहुणे सामिल होणार आहेत. बोललं जात आहे की पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका देखील पोहोचल्या आहेत.

याआधी अली फझलने लग्नाविषयी माहिती देताना सांगितलं होतं की जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या मित्रांसोबत एक सेलिब्रेशन पार्टी प्लॅन करणार होता. कारण त्यानंतर ऋचा आणि अली आपल्या हातातील प्रोजेक्ट पूर्ण करण्यात बिझी होणार होते.

दोघांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर अली आणि ऋचा दोघं 'फुकरे ३' मध्ये एकत्र दिसणार आहेत. या व्यतिरिक्त अली 'खुफिया','बांवरे', 'हॅप्पी अब भाग जाएगी' हे बॉलवूड प्रोजेक्ट तर 'कंधार' हा हॉलीवूडचा प्रोजेक्ट करत आहे. तर ऋचा चड्ढा 'अभी तो पार्टी शुरु हुई है' मध्ये काम करत आहेत. हे दोघे मिळून 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या सिनेमाची निर्मिती देखील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT