Ali Fazal Bollywood Actor mirzapur web serise esakal
मनोरंजन

Ali Fazal : 'कधीही कुणाची हुजरेगिरी केली नाही, हांजी हांजी कशाला करायची'? मिर्झापूरचा 'गुडडू भैय्या' बोलून गेला!

काही वर्षांपासून अली फझल हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसतो आहे.

युगंधर ताजणे

Ali Fazal Bollywood Actor mirzapur web serise :

मिर्झापूर नावाच्या वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेल्या अली फझल या अभिनेत्याची गोष्टच वेगळी आहे. ज्यांनी ३ इडियट्स पाहिला असेल त्यामध्ये रॉय च्या भूमिकेतही तो चमकला होता. मात्र त्याला जी ओळख हवी होती ती मिर्झापूरमधल्या गुड्डू भैय्यानीच दिली.

काही वर्षांपासून अली फझल हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि हॉलीवूडच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसतो आहे. त्याची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच त्याचं प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत त्यानं लग्न केले. दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी त्यांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात अली फझलची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

Also Read - माणसं मशीन्सशी संवाद करतील आणि ही आश्चर्याची गोष्ट नसेल..

त्या मुलाखतीमध्ये अलीला तुला कोणत्या माध्यमात काम करण्यास जास्त आवडते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं की, मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास जास्त आवडते. तो फॉर्म जबरदस्त आहे. त्याची सर अन्य कशाला नाही. त्यातून मला मिळालेली लोकप्रियताही मोठी आहे. हे मला आवर्जून सांगायला हवे.

अली फझलचा संघर्ष मोठा आहे. त्याला कुणीही गॉडफादर नाही. त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर स्वताची वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये तयार केली आहे. यावरुन त्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यानं त्याच्या स्वभावाला साजेसे उत्तर दिले. जे आता चर्चेत आले आहे. त्या प्रश्नावर तो म्हणतो, मला कोणत्याही एका माध्यमात अडकून पडायचे नाही. कलाकारानं सतत नवनवीन माध्यमांचा आणि कथेचा शोध घ्यायला पाहिजे.

तुम्हाला तुमच्या क्षमतेवर काम मिळायला हवे. असे मला वाटते. शेवटी तुमचे काम बोलते. सध्या भारतीय कलाकारांची हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात कास्टिंग होत आहे. आपल्यासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. पण मी हे सगळं सांगत बसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी आजवर मला काम मिळावे म्हणून कुणाची हुजरेगिरी केलेली नाही. मला ते आवडतही नाही.

तुम्हाला तुमच्या कामातून सिद्ध करायचे आहे. हे लक्षात घ्या. माझ्याकडून कुणाची विनाकारण स्तूती होत नाही. मी स्वतालाही प्रमोट करण्याच्या भानगडीत पडत नाही. माझे काम आवडल्यास निर्माते आणि दिग्दर्शक मला कास्ट करतीलच की यावर माझा ठाम विश्वास आहे. अशा शब्दांत अलीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT