Ali Zafar Latest News
Ali Zafar Latest News Ali Zafar Latest News
मनोरंजन

Ali Zafar : ...तर शाहरुख खानचे नुकसान होईल; काय म्हणून गेला पाकिस्तानी कलाकार

सकाळ डिजिटल टीम

Ali Zafar Latest News २०१६ मध्ये ‘डियर जिंदगी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता अली जफरने (Ali Zafar) किंग खान शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटात आलिया भट्टही होती. अली हा आलियाचा बॉयफ्रेंड बनला होता. मात्र, चित्रपटात अलीचा शाहरुखसोबत एकही सीन नव्हता. शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) पुन्हा कधी काम करायचे आहे असे विचारले असता तो म्हणाला, असे केल्याने शाहरुखचे नुकसान होईल.

पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने २०१० मध्ये ‘तेरे बिन लादेन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने कतरिना कैफच्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटासह ९ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘डिअर जिंदगी’ हा त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांचा मोठा विरोध झाला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर बंदी घातली होती. त्यावेळी अली जफरला (Ali Zafar) ‘डिअर जिंदगी’तून रिप्लेस करण्याची बातमी आली होती. मात्र, तो चित्रपटात होता.

सध्यातरी शाहरुख खानने (Shah Rukh Khan) माझ्यासोबत काम करू नये. तिथे अडचणी वाढतात. अलीने शहनाज गिलसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करूनही शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिला. ‘शहनाज, तुला आवड असेल तर मला माझे एक गाणे तुझ्यासोबत करायला आवडेल’ असेही अली जफर म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT