Alia Bhatt Babymoon Latest News Alia Bhatt Babymoon Latest News
मनोरंजन

Babymoon : आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो; सोनम कपूर म्हणाली...

या सूर्यप्रकाशासाठी मी कायमची ऋणी राहीन

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Babymoon Latest News यावर्षी आई होणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने तिचा बेबीमूनमधील (Babymoon) पहिला फोटो शेअर केला आहे. नुकतीच आलिया पती रणबीरसोबत बेबीमूनसाठी रवाना झाली आहे. हे जोडपे बेबीमूनसाठी इटलीला रवाना झाले आहे. बेबीमून एन्जॉय करीत असलेल्या आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर स्वतःचा सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. परंतु, या फोटोत रणबीर कपूर दिसत नाही आहे.

आलियाच्या (Alia Bhatt) बेबीमूनच्या सुट्ट्यांमधील हे पहिले अपडेट आहे. कोणत्याही मेकअप शिवाय छायाचित्र पोस्ट करीत आलियाने लिहिले, ‘या सूर्यप्रकाशासाठी मी कायमची ऋणी राहीन. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’ आलियाच्या जवळच्या मित्रांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. आलियाची सासू नीतू कपूर यांनी लिहिले आहे, माझी सुंदरी (My beauty).

आलियाची आई सोनी राजदान यांनी या छायाचित्रावर टिप्पणी केली की, हा एक सुंदर सूर्यप्रकाशाचा फोटो आहे. कमेंट सेक्शनमध्ये सोनम कपूरची (Sonam Kapoor) प्रतिक्रियाही खास आहे. सोनमने लिहिले आहे की, मी माझ्या बेबीमूनलाही (Babymoon) येथे गेली होती. हे खूप छान आहे. मजा करा. तुम्हाला सांगतो की सोनम कपूरही लवकरच आई होणार आहे. सोनम कपूरही तिच्या बेबीमूनमनचा खूप सुंदर फोटो शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

SCROLL FOR NEXT