Alia Bhatt BB OTT 2 Not sister Pooja bhatt, but these members of the Bigg Boss house are Alia's favourites  SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt BB OTT 2: बहीण पूजा नाही तर बिग बॉसच्या घरातले हे सदस्य आहेत आलिया भटचे फेवरेट

आलिया भट्ट BB OTT 2 च्या घरात रॉकी आणि रानी म्हणुन कोणाला बघते हे तिने सांगीतले आहे

Devendra Jadhav

Alia Bhatt in Bigg Boss OTT 2 News: बिग बॉस OTT 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. अशातच Bigg Boss OTT 2 स्पर्धक, त्यांचं घरातलं वागणं अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. Bigg Boss OTT 2 ची किती हवा आहे, हे नुकत्याच एका अनुभवावरुन दिसलं.

आज शुक्रवारी रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी आलिया भटला Bigg Boss OTT 2 मधील रॉकी आणि रानी कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आलियाने दिलेलं उत्तर फार चर्चेत आहे.

(Alia Bhatt BB OTT 2 Not sister Pooja bhatt, but these members of the Bigg Boss house are Alia's favourites

हे आहेत Bigg Boss OTT 2 मधील रॉकी आणि राणी

आलिया भट्ट सध्या रणवीर सिंग सोबत तिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करतेय. दरम्यान, आलियाचा प्रमोशनदरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया मनीषा राणी आणि एल्विश यादव यांना बिग बॉसच्या घरातील रॉकी आणि राणीचा टॅग देते.

आलिया तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंदीगढला पोहोचली. त्याचवेळी तिला कोणीतरी विचारले की, 'बिग बॉस'च्या घरात रॉकी आणि राणीसारखं कोण आहे? यावर आलिया म्हणाली, 'मी म्हणेन की मला एल्विश मला खुप रॉकीसारखा वाटतो."

आलियाला एल्विश का आवडतो?

आलिया एल्विशचं कौतुक करताना पुढे म्हणते.. "एल्विशची बोलण्याची पद्धत, त्याची शैली, खूप मनोरंजक आहे. तो खूप मजेदार आहे, मला तो खूप आवडतो, एल्विश हा शोचा रॉकी आहे

आणि मी मनीषा राणीला रानी बनवते कारण तिच्या नावात राणी देखील आहे. आणि मला वाटते की एल्विश आणि मनीषा या दोघांची जोडी खूपच गोंडस दिसू शकते.

बहीण पूजा भट्ट बद्दल आलिया काय म्हणाली?

त्याचवेळी आलियाला तिची बहीण म्हणजेच पूजाचीही आठवण आली. ती म्हणाली, मला माझी बहिण पूजा भट्टबद्दल सांगावंसं वाटतं, पूजा आमच्या भट्ट कुटुंबाची राणी आहे. ती जशी आहे तशी ती राणीसारखीच आहे.

दरम्यान आलिया आणि रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा आज शुक्रवारी २८ जुलैला रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT