मनोरंजन

Alia Bhatt Baby Girl: मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं अखेर गोड बातमी देऊन टाकली आहे. तिनं आज मुलीला जन्म दिला आहे,

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Baby Girl: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं अखेर गोड बातमी देऊन टाकली आहे. तिनं आज मुलीला जन्म दिला आहे, आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या गुड न्युजची चर्चा होती.

आलियाची प्रसूती नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. काही वेळेपूर्वी तिला रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच आलियाचे डोहाळजेवण पार पडले. यावेळी आलियाच्या गोड फोटो पाहून सारेच आनंदित झाले होते. ती सध्या पूर्णतः आपल्या प्रेग्नंसीवर लक्ष देत होती. आता ती लवकरच आई होणार असल्याने घरच्यांसोबत चाहतेही त्या दिवसाची वाट पाहत होते. प्रसुतीनंतर आलिया किमान एक वर्ष मॅटरनिटी लीव्ह घेणार आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आलिया प्रसूतीसाठी गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास आलिया आणि रणबीर हे रुग्णालयात दाखल झाले होते.

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आईबाबा झाल्याच्या बातमीनं नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आलियावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये केवळ आलिया आणि रणबीरची चर्चा होती. लग्नानंतर काही महिन्यातच आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली चाहत्यांना मोठा आनंद झाला. तेव्हापासून आलिया कधी आई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

एका मुलाखतीमध्ये आलियानं सांगितले होते की, मी आणि रणबीर आम्ही दोघेही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. गेल्या काही दिवसांपासून एका वेगळया फेजमधून जात आहोत. बाळंतपण, चित्रपटांचे शुटींग याचा नाही म्हटलं तरी परिणाम हा होतोच असेही दिसून आले होते. त्यामुळे बाळंतपणानंतर काही दिवसांचा ब्रेक घेणार आहे. त्यानंतर मी पुन्हा येईल. सध्याचा वेळ हा त्या लहान जीवासाठी असेल. अशी प्रतिक्रिया आलियानं दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : जग सोडताना त्याने जिवाभावाचा दोस्तही सोबत नेला ! प्रॉपर्टी डीलरने पाळीव कुत्र्यासह जीवन संपवले, बंद खोलीत आढळले मृतदेह

Nashik Highway News: पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ, गायमुख, एकलहरे येथे अंडरपास-ओव्हरब्रिजला गडकरींची तातडीची मंजुरी

Pune Police Recruitment News: शेतकरी कुटुंबातील प्रणाली पाटीलची संघर्षातून पुणे शहर पोलीस म्हणून निवड; लाखणगाव परिसरातून कौतुकाचा वर्षाव

Pargaon Police News: काठापूर बुद्रुकमध्ये मेंढपाळ महिलेची सव्वातीन लाखांची कापडी पिशवी ४८ तासांत शोधून पोलिसांनी परत केली

MI vs CSK Live: सर्वात मोठी बातमी; रोहित शर्मा, MS Dhoni ला वानखेडेवर खेळताना पाहण्यासाठी जाताय, मग हे नक्की वाचा...

SCROLL FOR NEXT