Alia Bhatt Daughter esakal
मनोरंजन

Alia Bhatt Daughter : 'आलिया ही तुझी राहाच ना? तो फोटो कुणाचा?'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं एक फोटो हा सोशल मीडियावर शेयर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Bollywood actress Daughter Raha : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं एक फोटो हा सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावरुन चाहत्यांचा गोंधळ उडताना दिसतो आहे. जो फोटो पाहण्यासाठी चाहते गेल्या काही दिवसांपासून उत्सुक होते. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर लाखो चाहत्यांनी आलिया-रणबीरच्या लेकीला आशीर्वाद दिले आहेत. त्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

आलियाचं इंस्टाग्राम अकाउंट चर्चेत आलं आहे. त्याला कारण तो फोटो. चाहत्यांनी त्या फोटोमधल्या मुलीचं तोंडभरून कौतूक केलं आहे. बॉलीवूच्या सेलिब्रेटींना त्यांच्या मुलांचे फोटो इंस्टावर पोस्ट करणं नेहमीच आवडतं. मात्र कुणा एखादा पापाराझी लपून छपून ते फोटो पोस्ट करत असेल तर त्याच्यावर ते आगपाखड केल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट अनुष्का, बिपाशा, सोनम कपूर यांच्या पोस्टकडे पाहिल्यावर कळते.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

आलियानं फोटो शेयर केल्यानंतर देखील तिला चाहत्यांनी प्रश्न विचारला आहे तो म्हणजे आलिया ही तुझी राहा आहे का? आलियानं मुलीचा फोटो शेयर करत ती एका नामांकित कपड्यांच्या कंपनीची जाहिरात करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे तो म्हणजे तो फोटो आलियाच्या राहाचा आहे की आणखी कुणाचा?

आलियानं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरनं मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे. आता तिची मुलगी ही चार महिन्यांची झाली आहे. आलियानं ज्या मुलीचा फोटो इंस्टावर शेयर केला आहे तो आलियाच्या मुलीच्या वयाचा आहे. त्यामुळे चाहत्यांना तो फोटो राहाचा वाटतो आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी तो दुसऱ्याच कुण्या मुलीचा असल्याचे म्हटले आहे.

दुसरं म्हणजे आलियानं तो फोटो पोस्ट करताना असे कुठेही लिहिलेलं नाही की तो फोटो राहाचा आहे. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांवरुन ते किती गोंधळलेले आहे हे दिसून येते. एकानं म्हटलं आहे की, हा फोटो आलियाच्या राहाचा आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, ही खरच राहा आहे का... त्यानंतर आलियानं चाहत्यांना जास्त वेळ गोंधळात न टाकता वेगवेगळ्या लहान मुलांचे फोटो शेयर करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT