National Awards 2023 Allu Arjun Alia Bhatt Kriti Sanon other actors esakal
मनोरंजन

National Awards 2023 : आलियाला गंगुबाईनं मिळवून दिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

गंगुबाई काठियावाडी चित्रपटामध्ये आलियानं जो अभिनय केला त्याबद्दल तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

National Awards 2023 Allu Arjun Alia Bhatt Kriti Sanon other actors : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचं नाव आता राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाणार आहे. तिच्या नावावर पहिला राष्ट्रीय पुरस्कार जमा झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये आलियानं साकारलेल्या गंगुबाईच्या भूमिकेबद्दल तिला गौरविण्यात आले आहे.

गंगुबाई काठियावाडीमध्ये आलियानं जो अभिनय केला त्याबद्दल तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ६९ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यंदा प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

याशिवाय आलिया भट्ट, अल्लू अर्जून, क्रिती सेनॉन या कलाकारांना देखील विविध नामांकनातून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. आलियाचा गौरव झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारानं आपल्या वाट्याला यावा अशी प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असते. यंदाच्या वर्षी ज्या कलाकारांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.

या पुरस्काराच्या वेळेस आलियाची चर्चा होण्याचे दुसरे कारण म्हणजे आलियानं तिच्या लग्नाची साडी परिधान करुन हा पुरस्कार स्विकारला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आलियाच्या नावाची चर्चा सुरु होती. पुरस्कार स्विकारल्यानंतर आलियान म्हटले की, आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी कृतज्ञ आहे. असे आवर्जून सांगावेसे वाटते.

आलियासोबत यावेळी तिचा पती अभिनेता रणबीर कपूरही होता. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आलियासोबत यावेळी क्रिती सेनॉनला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे दिसून आले. तिनं मिमी या चित्रपटात सरोगेट मदरची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT