Alia Bhatt photo esakal
मनोरंजन

Alia Bhatt : 'आमच्या घरात डोकवायला लाज कशी वाटत नाही!' अनुष्का आलियाच्या पाठीशी

आलियाच्या बाबत जे काही झालं ते इतकं लाजिरवाणं आहे की आपण कोणत्या पातळीवर आलो आहोत हे दिसतं.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt bollywood actres privacy break photo viral : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे समोर येताना दिसतो. आता बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीचा तिच्या घरातील फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्या अभिनेत्रीचे नाव आलिया भट. आलियाचा घरातील फोटो व्हायरल झाल्यानं तिनं संताप व्यक्त केला आहे.

आलियाच्या बाजुनं अनुष्कानं तिची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना काहीही वाटत नाही. आलियाच्या बाबत जे काही झालं ते इतकं लाजिरवाणं आहे की आपण कोणत्या पातळीवर आलो आहोत हे दिसतं. बॉलीवूड सेलिब्रेटींविषयी प्रेम असणे वेगळे पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सातत्यानं ढवळाढवळ करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न यावेळी अनुष्कानं नेटकरी आणि पापाराझ्झींना विचारला आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Alia Bhatt Bollywood actress privacy break photo viral

आलिया ही तिच्या घरातील लिव्हिंग रुममध्ये बसली होती. तेव्हा काही दोन अज्ञात व्यक्तींनी तिची शुटींग करायला सुरुवात केली. आलियानं त्या दोघांनाही पकडले. त्यानंतर आलियानं सोशल मीडियावर मोठी पोस्ट शेयर केली. त्यामध्ये ती म्हणते, लोकांना आमच्याविषयी काय वाटते हेच कळत नाही. आम्हाला आमची स्पेस नावाची गोष्ट आहे की नाही, अशाप्रकारे शुटींग करण्याची काय गरज होती, तुम्ही माझ्यासोबत गंमत करत आहात का, असा प्रश्न आलियानं उपस्थित केला आहे.

तुम्हाला आमची प्रायव्हसी ब्रेक करण्याचा अधिकार कुणी दिला, तुम्ही असे का करता, जेव्हा पाहावं तेव्हा तुम्ही सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी धावत असता, हा सगळा प्रकार कशासाठी असेही आलियानं विचारले आहे. अनुष्कानं म्हटलं आहे की, आमच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. जे काही झाले ते अतिशय लाजीरवाणे आहे. आमच्या मुलीचा फोटो व्हायरल झाला होता. तेव्हा मी अतिशय नाराज झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS News: नोकरकपातीनंतर टीसीएसची मोठी घोषणा! कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेरिएबल पे देण्याचा निर्णय, कुणाला किती मिळणार?

Durgapur Medical College Rape Case : बंगालमध्ये ‘आरजी कर’ घटनेची पुनरावृत्ती ; विद्यार्थीनीचा आधी फोन हिसकावला, मग जंगलात नेलं अन् ...

Kej News : कोरडेवाडी ग्रामस्थांचे तलावाच्या मंजूरीसाठी जलसमाधी आंदोलन; पोटात पाणी गेलेल्या तीन-चार आंदोलकांना रूग्णालयात हलविले

Nashik News : नाशिकच्या 'भाऊ-दादां'चे बॅनर उतरले; महापालिकेची धडक मोहीम, चौकांनी घेतला मोकळा श्वास!

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पाचोर्‍यातील कोळी बांधवांचे अन्नत्याग उपोषण

SCROLL FOR NEXT