Alia Bhatt bollywood actress viral old interview esakal
मनोरंजन

Alia Bhatt : झाली वडिलांची दोन लग्नं, त्याला काय होतंय! विश्वासघात करणं तर... आलियाची बिनधास्त प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आलियाला आपल्या मतांवर ठाम राहणे जमले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt bollywood actress viral old interview : प्रसिद्ध अभिनेत्री आलिया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आलियाला आपल्या मतांवर ठाम राहणे जमले आहे. त्यासाठी तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले तरी त्याचा कुठलाही परिणाम आलियावर झालेला नाही. आता आलियानं वडिलांच्या वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टींविषयी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये आलियानं महेश भट्ट यांची बाजू घेतली आहे. कलंक या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आलियाला लग्न, घटस्फोट, विवाहत्तेर संबंध यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी तिनं तिच्या वडिलांच्या नात्यावर खुलासा केला आहे. मला वाटतं विश्वासघात यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. माझा आय़ुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे काळी आणि पांढरी बाजू पाहताना नेहमीच वेगवेगळ्या शक्यता मी विचारात घेत असते. असे आलियानं म्हटले आहे.

Aजीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

मला माणसांना समजून घ्यायला आवडते. ते कोणत्या परिस्थितीमध्ये कसे वागतात याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण बऱ्याचदा वेगळ्याच गोष्टींमुळे लोकांना पारखत असतो आणि त्यावरुन त्यांच्याविषयीचे मतं ठरवतो. त्यामुळे मला आहे त्या परिस्थितीमध्ये काय विचार केल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला हे जाणून घेणे महत्वाचे वाटते. असे आलियानं सांगितलं आहे.

त्या मुलाखतीमध्ये आलियानं आणखी सांगितलं की, आता आपला समाज वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही जर आपल्या समाजाचा इतिहास पाहिला तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील, त्या विश्वासघाताशी संबंधित आहे. विश्वासघात करणे किंवा कुणाला धोका देणं ही काही नवीन गोष्ट नाही. ती यापूर्वी देखील झाली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट फार नवीन आहे असे लोकांनी म्हणू नये.

विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंध यावर आलियानं जी कमेंट केली आहे ती आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. वडिलांची बाजूनं बोलणं आलियाला महागात पडताना दिसते आहे. एका युझर्सनं कमेंट केली आहे. आलियाला नेमकं काय म्हणायचे आहे, ती देखील आता वडिलांसारख्या गोष्टी बोलते आहे. दुसऱ्या युझर्सनं म्हटले आहे की, रणबीर तुला जेव्हा धोका देईल किंवा तुझा विश्वासघात करेल तेव्हा तुला कळेल...या शब्दांत तिचे कान टोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT